शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील कारागृहातील आरोपी पलायन प्रकरणाची होणार विभागीय चौकशी - कारागृह उप महानिरीक्षकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:43 IST

स्वयंपाकाची तयारी करताना कारागृहातून पळाले दोन आरोपी

ठळक मुद्दे१७ फूट उंच भींतीवरुन उडी घेत झाले पसार निष्काळजीपणा

जळगाव : कारागृहात कैद्यांसाठी स्वयंपाकाची तयारी करीत असताना भिस्ती अमलदार दूध घ्यायला गेल्याची संधी साधत रवींद्र भीमा मोरे (वय २७, रा.बोदवड) व शेषराव सुभाष सोनवणे (वय २८, रा.बिलवाडी, ता.जामनेर) या दोन आरोपींनी १७ फूट उंच भिंतीवरुन उडी घेऊन कारागृहातून पलायन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी सहा वाजता घडली होती. या प्रकरणाची विभागीय चौकशी होणार असल्याची माहिती कारागृह उप महानिरीक्षक योगेश देसाई यांनी जळगावात दिली.रवींद्र मोरे व शेषराव सोनवणे यांना पिंपळगाव हरेश्वरला दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात ३० आॅगस्ट २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ४ सप्टेबर रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या दोन्ही आरोपींना बॅरेल क्र.५ मध्ये ठेवण्यात आले होते. दोघांना स्वयंपाक बनविता येत असल्याने त्यांना स्वयंपाक करणाऱ्या आरोपींच्या स्वतंत्र बॅरलमध्ये (भिस्ती) ठेवण्यात आले होते.दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगारकारागृहातून पलायन केलेला रवींद्र मोरे व शेषराव सोनवणे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. आॅगस्ट महिन्यात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी या दोघांना बियाणे व खतांचे दुकान फोडल्याच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास होता. या दोन्ही जणांनी मालेगाव, पाचोरा, जालना, औरंगाबाद व जळगाव शहरात चोºया व घरफोड्या केलेल्या आहेत.यापूर्वीही केले होते एका आरोपीने पलायनदीड वर्षापूर्वी कारागृहातून १५ फूट उंच भींतीवरुन उडी घेऊन सदा उर्फ सुधाकर मधुकर पवार उर्फ बंदर (रा.बोदवड) या आरोपीने पलायन केले होते. गोदामातून टायर चोरीच्या केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती.या घटनेनंतर कारागृहाच्या भींतीची उंची वाढविण्यात आली होती. त्यानंतरही बुधवारी दोन आरोपींनी पलायन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव