शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालिकेच्या डोळ््याला गंभीर इजा, शस्त्रक्रियेदरम्यान पडले ५० टाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:32 IST

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच असून दादावाडी परिसरातील कल्याणीनगरातील योगिता योगेंद्र बढे (१०) या बालिकेच्या डाव्या डोळ््याचा भटक्या कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याने तिच्या डोळ््याला ५० टाके पडले आहेत. या हल्यात डोळ््यासह हात व पायाचाही कुत्र्याने लचका तोडला असून बालिकेच्या डोळ््याची बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली.कल्याणीनगरातील रहिवासी ...

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढतच असून दादावाडी परिसरातील कल्याणीनगरातील योगिता योगेंद्र बढे (१०) या बालिकेच्या डाव्या डोळ््याचा भटक्या कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याने तिच्या डोळ््याला ५० टाके पडले आहेत. या हल्यात डोळ््यासह हात व पायाचाही कुत्र्याने लचका तोडला असून बालिकेच्या डोळ््याची बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली.कल्याणीनगरातील रहिवासी व नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयाची विद्यार्थिनी योगिता बढे ही ७ रोजी दुकानावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली व थोडी पुढे जात नाही तोच भटक्या कुत्र्याने हल्ला करीत थेट तिच्या डाव्या डोळ््याचा कडाडून चावा घेतला. या वेळी काही नागरिक तेथे बसले असताना त्यांना ही मुलगी कुत्र्यासमोर खेळत आहे, असे वाटले. मात्र कुत्रा तिला चावा घेत असल्याचे लक्षात येताच तिची सुटका करण्यात आली. या हल्यात बालिकेच्या डोळ््यात खोलवर जखम झाली असून तिच्या हात, पाय व पार्श्व भागाचाही कडाडून चावा घेतल्याने बालिका गंभीर जखमी झाली. या वेळी तिला तत्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.डोळ््याला इतक्या खोलवर जखम झाली आहे की, उपचार करणेही कठीण होत. अखेर ९ रोजी या मुलीच्या डोळ््यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये डोळ््याच्या आत व बाहेर असे जवळपास ५० टाके पडल्याचे तिचे वडील योगेंद्र बढे यांनी सांगितले.शहरात मोकाट कुत्र्यांच्या या वाढत्या दहशतीमुळे शहरवासीय त्रस्त असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी मनपाने सहा वेळी निविदा काढल्या, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मनपा कडून प्रयत्न सुरू आहेत.- उदय पाटील, आरोग्य अधिकारी मनपा.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव