शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘हमी भावा’बाबत शासनाचे आदेशच नाही, जळगाव कृउबा सभापतींची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 13:12 IST

शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत आणण्याचे आवाहन

जळगाव : सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दरात मालाची खरेदी केल्यास दंड व शिक्षेची तरतूद असण्याच्या वृत्ताने व्यापारी तसेच शेतकºयांमध्येही संभ्रम निर्माण झाला असला तरी तसे कोणतेही परिपत्रक नसल्याचा दावा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी केला आहे. त्यामुळे शेतकºयांनी आपला माल बाजार समितीत आणावा, तो खरेदी केला जाईल, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.या संदर्भात मंगळवारी संध्याकाळी कृउबामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यात सभापती पाटील यांनी ही माहिती दिली. या वेळी उपसभापती मनोहर पाटील, संचालक प्रभाकर पवार, वसंत भालेराव, अनिल भोळे, मुरलीधर पाटील, कैलास चौधरी, भाजीपाला हमाल मापाडी महिला कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धुडकू सपकाळे उपस्थित होते.चार दिवसांपासून व्यवहार ठप्पपाटील पुढे म्हणाले की, सोशल मीडिया तसेच माध्यमांद्वारे सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दरात मालाची खरेदी केल्यास दंड व शिक्षेची तरतूद असण्याचे वृत्त पसरल्याने शेतकºयांनी माल आणला तरी तो व्यापारी खरेदी करीत नसल्याने चार दिवसांपासून बाजार समितीमध्ये व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.या संदर्भात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीच स्वत: तसे परिपत्रक नसल्याचे जाहीर केले असून पणन महासंघानेही पत्र काढून असे परिपत्रक नसल्याचे जाहीर केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयांनी कोणत्याही भूल थापांना बळी न पडता आपला माल बाजार समितीमध्ये आणावा तो खरेदी केला जाईल असे सांगून या संदर्भात कोणतीही अडचण आल्यास सभापती अथवा बाजार समितीशी संपर्क साधण्याचेही आवाहन त्यांनी केले.सरकारचे दुहेरी धोरणसरकारने जाहीर केलेल्या हमी भावाच्या तुलनेत बाजारातील भाव कमी असल्याने व्यापारी हमी भावात माल कसे खरेदी करणार असा सवाल त्यांनी केला. एकीकडे सरकार हमीभाव जाहीर करते व त्यापेक्षा सरकार खरेदी करणाºया मालाच्या कमी दराने निविदा काढते, यामुळे कोणता व्यापारी माल खरेदी करेल, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यासाठी सरकारने केवळ तालुक्याच्या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र न ठेवता प्रत्येक गावात खरेदी केंद्र सुरू करून हमीभावात माल खरेदी करावा अथवा मध्यप्रदेश सरकार प्रमाणे भावांतर योजनेंतर्गत फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी केली.याविषयी दुपारी व्यापारी, आडते, दालमिलचालक यांची बैठक घेऊन त्यातही तसे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव