शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वाढते तापमान, इसमाचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 12:52 IST

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न समारंभाहून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कंझरवाडा परिसरात घडली. दरम्यान, उष्माघात आहे की काय हे आताच सांगता येत नाही मात्र टेंभुर्णे यांच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती, असे वैद्यकीय ...

ठळक मुद्देउष्णतेची लहरटेंभुर्णे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न समारंभाहून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कंझरवाडा परिसरात घडली. दरम्यान, उष्माघात आहे की काय हे आताच सांगता येत नाही मात्र टेंभुर्णे यांच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज महाजन यांनी सांगितले.शहरातील जलाराम नगर येथील रहिवासी गजानन केशव टेंभुर्णे हे सकाळी दुचाकीने जळगाव येथून पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. दुपारी जळगावकडे येत असताना अचानकपणे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते कंजरवाडा समोरील वखारीजवळ थांबले. त्याचठिकाणी ते खाली कोसळून त्यांना उलटी झाली व ते बेशुद्ध पडले. त्या वेळी परिसरातील दोन युवकांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्याच या बाबत माहिती दिली. काही वेळातच त्यांची पत्नी कल्पना टेंभुर्णे त्याठिकाणी पोहचल्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झवर हेदेखील त्याठिकाणी पोहचले व मदत कार्य करीत टेंभुर्णे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ. धीरज महाजन यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मयत घोषीत केले.जिल्हा रुग्णालयात आक्रोशजिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गजानन टेंभुर्णे यांना मयत घोषीत करताच त्यांची पत्नी कल्पना टेंभुर्णे यांनी आक्रोश केला. यावेळी नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती.उष्णतेची लहरतापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उष्णतेची लहर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव