शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वाढते अपघात चिंताजनक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:03 IST

सुनील पाटीलअपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचाजीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, १८ ते ४५ या वयोगटातील तरुण ठार होण्याचे प्रमाण ६९ टक्के ...

सुनील पाटीलअपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचाजीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, १८ ते ४५ या वयोगटातील तरुण ठार होण्याचे प्रमाण ६९ टक्के आहे. एकट्या महाराष्टÑाची आकडेवारी ८ टक्के आहे. सर्वाधिक अपघात अति वेग व त्यानंतर मद्य प्राशन केल्याने झालेले आहेत.अपघातात जीव जाणारे तरुण व पुरुष हे घरातील प्रमुख तसेच कर्तेच आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडते. दरवर्षी राज्य शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. या अभियानावर लाखो रुपये खर्च होतात. अपघात कमी होऊन लोकांचे जीव वाचावे हाच त्यामागचा उद्देश आहे. एका सर्वेक्षणात चालकाच्या चुकीमुळेच जास्त अपघात झालेले आहेत. शासन उपाययोजना करेल, त्यावर लाखो, कोट्यवधीचा खर्च होईल. शासकीय सोपस्कार पार पडले या सर्व बाबी होतील, मात्र नागरिक व वाहनधारक म्हणून प्रत्येकाचीही काही जबाबदारी आहेत. आपल्या चुकीमुळे स्वत:चा किंवा दुसऱ्या जीव जाईल किंवा कायमचे अपंगत्व येवू शकतो,याचे भान ठेवणे गरजेचे आहे. कोणी सांगेल तेव्हाच ऐकण्यापेक्षा स्वत:ला शिस्त लावली तरी अपघाताचे प्रमाण कमी होईल व त्यातून अनेकांचे जीव वाचतील. जळगाव जिल्ह्यात पाच वर्षात ४ हजाराच्यावर अपघात झाले आहेत. त्यात अडीच हजार जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा हजाराच्यावर तरुण व महिला जखमी झाल्या आहेत.गेल्या वर्षीच साडे चारशे जणांचा मृत्यू झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ही शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात असे अनेक अपघात आहेत की त्याची पोलीस दप्तरी नोंद नाही. मंगळवारचाच दिवस घेतला तर जिल्ह्यात पाच मोठे अपघात झाले. त्यात तीन जण ठार तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या सर्व अपघातात चालकाच्याच चुका असल्याचे निदर्शनास आले. त्यात निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने स्वत: लाच शिस्त लावली तर अनेक संकटे टळतील. त्याशिवाय वाहतूक पोलीस दंड करतील व तेव्हाच आपण शिस्त लावू ही मानसिकता घातक आहे. पोलिसांना पैसे देऊन शिस्त लावण्याची आवश्यकता का वाटते? मानव जन्म व मृत्यू इतका सोपा आहे का? याचाही विचार व्हायला हवा.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव