शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डाळ निर्यातीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:45 IST

जळगाव : कोरोनामुळे कोठे घसरण तर कोठे बाजार अस्थिर होत असताना दुसरीकडे देशातून निर्यात होणाऱ्या डाळींच्या प्रमाणात वाढ होत ...

जळगाव : कोरोनामुळे कोठे घसरण तर कोठे बाजार अस्थिर होत असताना दुसरीकडे देशातून निर्यात होणाऱ्या डाळींच्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे निर्बंध येण्याच्या भीतीने विविध देश डाळींची आगाऊ मागणी करीत त्यांचा साठा करून ठेवत आहेत. त्यामुळे जळगावातील दालमिलमधून निर्यातीचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. े सध्या दररोज जळगावातून १८० ते २२५ टन डाळींची निर्यात होत आहे.कोरोनामुळे सध्या जागतिक बाजार पेठेला चांगलेच वेढले असून त्यामुळे शेअर बाजारात घसरण होेण्यासह सोने-चांदी, इंधनाच्या भावातही घसरण होत आहे. सोबतच भारतीय रुपयादेखील गडगडत आहे. मात्र दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरच डाळींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.जळगावात ६० ते ६५ दालमिल असून त्यामधून तयार झालेल्या डाळी दररोज येथून मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. एरव्ही साधारण १५० ते २०० टन डाळ दररोज अमेरिका, कॅनडा, युरोप, आॅस्ट्रेलिया यासह वेगवेगळ््या देशात निर्यात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे विविध देशांमधील मालाच्या आयात-निर्यातीवर परिणाम होऊ लागल्याने हे देश डाळींची वाढीव खरेदी करू लागले आहे. चीनमधून जगभर पसरत असलेल्या कोरोनामुळे विविध देश धास्तावले असल्याने खाद्य पदार्थांची चणचण नको म्हणून त्यांचा साठा करीत असल्याचे जाणकारांनी सांगितले. त्यात डाळदेखील आवश्यक असल्याने भारताकडून खरेदी होणाºया डाळींचा साठा करण्यावर हे देश भर देत आहेत. सध्या चीनमधील बाजारपेठ कोलमडल्याने तेथून माल खरेदी करणे शक्य नसल्याचे लक्षात घेत भारताकडे खरेदीचा ओढा वाढत आहे. परिणामी येथील डाळीलादेखील चांगलीच मागणी वाढली आहे.कोरोनामुळे डाळींच्या आयात-निर्यातीवर कधी निर्बंध येतील याची शाश्वती नसल्याने विविध देशांकडून डाळींची मागणी वाढली आहे. त्यामुळे डाळींची निर्यातदेखील वाढत आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :businessव्यवसायJalgaonजळगाव