शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गव्हावरील आयात शुल्क वाढीने ग्राहकांच्या खिशाला झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 12:02 IST

१० टक्के शुल्क वाढ

जळगाव : विदेशातून आयात होणाऱ्या गव्हावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने १० टक्क्याने वाढ केल्याने देशातच पिकणाºया गव्हाच्याही भावात २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे. पीठ (आटा), रवा, मैदा मिलसाठी वापरात येणाºया विदेशी गव्हावर ही शुल्क वाढ असली तरी त्याचा घरगुती वापराच्या गव्हाच्या भावावरही परिणाम होऊन ग्राहकांच्या खिशाला त्याची झळ बसत आहे. दरम्यान, सध्या तयार पीठ, रवा, मैदा यांच्या भावात अद्याप कोणतीही वाढ नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.तयार पीठ (आटा), रवा, मैदा मिल या ठिकाणी कच्चा माल म्हणून विदेशातून येणाºया गव्हाचा वापर केला जातो. यात खास करून आॅस्ट्रेलियातून येणाºया गव्हाला अधिक पसंती दिली जाते. आॅस्ट्रेलियातून येणाºया या गव्हावर पूर्वी २० टक्के आयात शुल्क आकारले जात असे.मात्र आता केंद्र सरकारने त्यात १० टक्क्याने वाढ केली असून हे आयात शुल्क थेट ३० टक्के करण्यात आले आहे. यामुळे साधारण १९०० ते २००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या या गव्हाच्या भावात थेट २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन तो २१०० ते २२०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचला.भारतीय गव्हाला वाढली मागणीविदेशातून येणाºया गव्हाच्या भावात वाढ झाल्याने सध्या बाजारात येणारा मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेशातील नवीन गव्हाला पीठ मिल मालकांकडून मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे या देशी गव्हाच्याही भावात २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे. यात गेल्या आठवड्यात २१०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव सध्या २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. या सोबतच लोकवन गव्हाचे भाव २००० ते २१०० रुपये प्रती क्विंटलवरून २२०० ते २३०० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसी गव्हाचे भाव ३६०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटलवरून ३८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.आणखी भाववाढीची शक्यतासध्या बाजारात नवीन गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने आयात शुल्क वाढले तरी केवळ भावात थोडीफार वाढ झाली आहे, मात्र नवीन गव्हाची आवक कमी झाल्यानंतर महिना-दीड महिन्यात भारतीय गव्हाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव