शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर शहरात डेंग्यू व मलेरिया रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:16 IST

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केली पाहणी : नगरपालिकेकडून स्वच्छता मोहिम सुरु

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतली रुग्णांची भेटजामनेर मुख्याधिकाऱ्यांना दिले स्वच्छता मोहिम राबविण्याचे आदेशआरोग्य अधिकाऱ्यांनी केली जामनेर शहराची पाहणी

आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.३ - शहरातील गिरणा कॉलनी, हिवरखेडा रोड, शंकर नगर भागात मलेरिया व डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. तसेच नगरपालिकेला स्वच्छता मोहिम राबविण्याचे आदेश दिले.नवीन वसाहतीत मोकळ्या जागेवर झाडे व झुडपे वाढली आहेत. नगरपालिकेने शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शुक्रवारी सकाळी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी ही बाब मोबाईलवर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना सांगितली. त्यांनी कार्यकर्त्यांसह खाजगी रुग्णालयात जावून उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.गिरीश महाजन यांनी मुख्याधिकारी यांना तत्काळ स्वच्छता मोहिम राबवून फवारणी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी बी.सी.बाविस्कर यांनी या भागात पाहणी केली. नगरपालिकेने आरोग्य कर्मचाऱ्यांना तत्काळ कामाला लावत शहरात फवारणी सुरु केली. गेल्या महिन्यात शहरात स्वाईन फ्ल्यू व डेंग्यूची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. यात एका गर्भवती महिलेचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला होता.या रुग्णांवर उपचार सुरुखाजगी रुग्णालयात सुमती अनंत महाजन, मंगला प्रल्हाद सोनवणे, गिरीश सुनिल देवरे, प्रल्हाद वामन महाजन, अलका भोई, अमोल चव्हाण, शुभम गायकवाड, अथर्व नाईक, ज्ञानेश्वर पाटील, नीलेश नेथे, हार्दिक नेवे, भागवत पाटील, नरेंद्र इंगळे, रमेश इंगळे, किरण पाटील, मनिष महाजन, जान्हवी महाजन उपचार घेत आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य