आॅनलाईन लोकमतसाकळी, ता.यावल, दि.९ : पुढील वर्षीच्या हजयात्रेसाठी हज कमेटीकडे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. २२ डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे हजकमेटी सूत्रांनी सांगितले.१५ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली. पूर्वी ७ डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र हज कमेटीच्या बैठकीत अर्ज भरण्यास आणखी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. हज कमेटीचे चेअरमन महेबूब अली कैसर, व्हा.चेअरमन जिनाह यांनी बैठक घेतली. त्यात भाविकांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. ७० वर्षीय भाविकांसोबत दोन भाविक जाण्याविषयी बैठकीत चर्चा झाली. याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सुत्रांनी सांगितले. शिवाय हज कमेटीतर्फे एक समिती सौदी अरब अमिरातीत राहण्याच्या सोयीविषयी करार करणार यासह अनेक निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकसुद खान यांनी सांगितले.अर्ज भरण्याच्या संख्येत घटहजयात्रेच्या नवीन धोरणामुळे हज यात्रा महाग झाली आहे. त्यामुळे यावर्षी तीन-चार दिवसापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार एक लाख ५६ हजार १५८ भाविकांचे अर्ज दाखल करण्यात आले आहे. गत वर्षाच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. नवीन धोरणानुसार ७० वर्षीय भाविकांचे आरक्षण कायम ठेवण्यात आले. मात्र सतत चार वर्ष व पाचव्या वर्षी अर्ज दाखल करण्याचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.
हजयात्रेसाठी अर्ज दाखल करण्यास मुदत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:11 IST
नवीन नियमांमुळे अर्ज दाखल करणाºया भाविकांच्या संख्येत घट
हजयात्रेसाठी अर्ज दाखल करण्यास मुदत वाढ
ठळक मुद्दे१५ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरूवातअर्ज भरण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढनवीन धोरणामुळे हज यात्रा झाली महाग