शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

विसंवादी सूर विकास कामांना मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:49 IST

प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील वादाच्या दुष्परिणामाचा इतिहास, निवडणुका लांब असताना विकासासाठी एक सूर का नाही?, वचनापासून लांब पळणाºया नेत्यांनी गमावला जनतेचा विश्वास

मिलिंद कुलकर्णीप्रगती आणि विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रथाच्या दोन चाकांमध्ये संवाद, समन्वय राहिला तरच गाडा सुरळीत चालतो. विसंवाद, संशय अशा बाबी आल्या तर मात्र ही स्थिती विकास कार्याला मारक ठरते. एकमेकांची उणीदुणी काढणे, आरोप प्रत्यारोप करणे यात शक्ती खर्च होते. हे कळत असूनही वळत नसल्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.जळगावात सत्ताबदल करताना नागरिकांनी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. ‘एक वर्षांत जळगावचा चेहरामोहरा बदलून दाखवेल, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मते मागायला येणार नाही’ असा निर्धार, निश्चय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यातील धडाडी, संकटमोचक अशी प्रतिमा पाहून जळगाव आणि पुढे धुळेकरांनी भाजपला बहुमत दिले. जळगावात तर आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौर झाला. एका कुटुंबात आमदार आणि महापौरपद आल्याने जळगावच्या विकासाचा रथ चौखूर उधळेल अशी अपेक्षा होती. पण दीड वर्षांत ती अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे या महापौर झाल्या. उपमहापौरपदाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कैलास सोनवणे यांनी स्थायी समितीचे सभापती म्हणून अतुलनीय कार्य वर्षभरात केले होते. त्यांच्या स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेमार्फत राष्टÑीय आणि स्थानिक विषयांविषयी अभियान, चळवळी आयोजित करतात. स्वाभाविकपणे सोनवणे दाम्पत्याकडून जळगावकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थात त्यांच्यापुढे प्रश्नांची मालिकादेखील मोठी आहे. अमृत पाणी योजना, भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, महामार्ग चौपदरीकरण, वॉटरग्रेस कंपनीकडील स्वच्छतेचे कंत्राट, शिवाजीनगर, असोदा व भोईटे नगर उड्डाणपूल असे अनेक विषय नागरिकांच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यापैकी केवळ स्वच्छतेच्या प्रश्नावरुन वादळ निर्माण झाले. प्रशासकीय अधिकाºयाविषयी तक्रार असेल तर महासभेत पुराव्यानिशी भंडाफोड करता येईल. आयुक्त किंवा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे तक्रार करता येईल. परंतु, अश्लिल शिवीगाळ, मारहाणीची धमकी देणे हे चुकीचे आहे. यातून प्रशासनाचे मनोबल खच्ची होईल. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेचे नेतृत्व स्विकारले असताना या प्रश्नी ते उघडपणे समोर का येत नाही, हा प्रश्न आहे. परवा, भाजप नगरसेवकांची गुप्त बैठक घेऊन वॉटरग्रेसचा ठेका रद्द करा, अशी सूचना त्यांनी दिली, असे सांगितले जाते. पण खरेच असे आहे की, पक्षांतर्गत सुंदोपसुुंदी शांत करण्यासाठी ही बैठक झाली, हे कळायला मार्ग नाही.गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, खासदार उन्मेष पाटील, महापौर भारती सोनवणे यांनी समन्वयाने काम केले तर शहराचा चेहरामोहरा बदलेल.एक वर्षांत जळगावचा विकास करुन दाखवेन या गिरीश महाजन यांच्या घोषणेचे काय झाले? महापालिकेत सावळागोंधळ सुरु असताना ते गप्प का? गुप्त बैठका घेऊन नगरसेवकांना ते काय संदेश देत आहेत, हे स्पष्ट व्हायला हवे.अधिकाºयाला शिवीगाळ, धमकी देण्याचेसमर्थन होऊच शकत नाही. महापौरांचे पती कैलास सोनवणे यांच्याविरुध्द अशा आशयाचा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेतील सत्ता ताब्यात असताना गैरव्यवहारात कोणीही अधिकारी सहभागी असेल तर पुराव्यासह ते जाहीर करा. महासभेत जाब विचारा. राज्य शासनाकडे तक्रार करायला हवी. असा विसंवाद हा विकास कामांसाठी मारक ठरतो.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव