शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षाच्या मुलीचे प्रसांगवधान, आई-बहिणीचे वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 19:43 IST

  जळगाव : पाच वर्षाच्या मुलीची समयसूचकता व प्रसंगावधानामुळे आई व दोन वर्षाच्या लहान बहिणीचे प्राण वाचल्याची घटना कोल्हे ...

 

जळगाव : पाच वर्षाच्या मुलीची समयसूचकता व प्रसंगावधानामुळे आई व दोन वर्षाच्या लहान बहिणीचे प्राण वाचल्याची घटना कोल्हे नगरात ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसीतील एका कंपनीत अधिकारी असलेले प्रसाद काळे हे कोल्हे नगरात पत्नी गुलबाक्षी (३३), मुलगी शिवांगी (५) व इशान्वी (२) यांच्यासह वास्तव्याला आहेत. ५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता ते ड्युटीवर गेल्यानंतर घरी पत्नी व दोन्ही मुली असे तिघंच होते. दोघं मुलींची आंघोळ घालण्यासाठी गुलबाक्षी यांनी स्टीलच्या बादलीत हिटर टाकून पाणी गरम केले. मात्र मुलींनी आंघोळ करण्यास नकार देऊन नंतर करु असे सांगितले. मुली बाहेर खेळायला गेल्याने त्या केव्हाच येतील, धोका नको म्हणून त्यांनी बटण बंद करुन पाणी थंड केले. त्यानंतर गुलबाक्षी यांनी स्वत : च्या आंघोळीसाठी पाणी गरम केले, परंतु पाणी घेतांना बटण बंद न करता बादलीत हात टाकला व त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.त्यात त्यांचा आवाज झाल्याने बाहेर खेळत असलेल्या दोघं मुली घरात धावत आल्या. आईचा चेहरा पाहून आई मस्करी करीत असल्याचे लहान मुलीला जाणवले व ती हसतच आईजवळ धावत गेली, परंतु मोठी मुलगी शिवांगी हिने प्रसंगावधान ओळखून तातडीने बहिणीला आईपासून लांब केले व प्लास्टीक टूलवर उभे राहून बटण बंद करुन बादलीतील वीजप्रवाह बंद केला. यात थोडा उशीर झाला असता तर कदाचित आई गुलबाक्षी व बहिण इशान्वी यांच्याबाबतीत दुर्घटना घडली असती.देवानेच बुध्दी दिलीपाच वर्षाच्या मुलीला वीज प्रवाह व इतर बाबींबाबत फारसे ज्ञान अवगत नसते, परंतु या घटनेबाबत शिवांगी हिला देवानेच काय ती बुध्दी दिली व तिने तात्काळ विज पुरवठा खंडीत करण्यासह लहान मुलीलाही आईपासून लांब केले. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ असाच हा प्रसंग होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव