जळगाव- मू़जे़ महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट आॅफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी विभागातर्फे शहरातील विवेकांनद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहा दिवसीय मोफत योग शिबीराचे उद्घाटन शाळेचे समन्वयक गणेश लोखंडे यांच्याहस्ते सोमवारी झाले़सोहम डिपार्टमेंट आॅफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी विभागाच्या एम.ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांतर्गत निलेश वाघ, जितेंद्र कोतवाल, जागृती ठाकरे आणि अपर्णा राणी यांनी वाघनगर येथील विवेकांनद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमधील पाचवीच्या १२० विद्यार्थ्यांना थोडक्यात योगाविषयी माहिती व मार्गदर्शन केले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २३ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर दरम्यान दररोज सकाळी ७ ते ७़३० दरम्यान योगाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेतले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना ओमकार, शांतीपाठ, गुरूवंदना, पुरक हालचाली, ध्यानात्मक आसने घेण्यात आले.
विवेकांनद स्कूलमध्ये योग शिबीराचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:46 IST