चाळीसगाव : इनरव्हील क्लब ऑफ संगमचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. चंद्रकला साळुंखे यांनी अध्यक्षपदाचा, तर नलिनी पाटील यांनी सचिवपदाचा पदभार स्वीकारला.
वर्षभरात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा संकल्प नूतन अध्यक्ष चंद्रकला साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रीय कन्या शाळेत झालेल्या हा सोहळा डिस्ट्रीक ३०३च्या अध्यक्ष जुलेखा शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सोनल साळुंखे, हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा राजपूत यांची उपस्थिती होती.
साधना निकम, जुलेखा शुक्ल यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनाकाळात उत्कृष्ट सेवा बजावणारे डॉ. रूपाली राजपूत, डाॅ. रूपसिंग राजपूत, डाॅ. उमेश जाधव, अन्नसेवा देणारे बाळासाहेब महाशब्दे, बी. पी. पगारे, नीलेश पाटील, समाधान पाटील यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनीषा मालपुरे, विद्या पाटील, सुचित्रा राजपूत, सविता राजपूत, अनिता मोरे, शर्मिला खैरनार, विजया नेरकर, जया ठाकरे, योगीता पाटील, वंदना साळुंखे उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन सुनीता भोसले यांनी केले. आभार वैशाली कुलकर्णी यांनी मानले.