शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

5 % GST ला विरोध, जळगावात एकाच दिवसात 70 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 17:29 IST

नॉन ब्रँडेड धान्यावरील जीएसटीला वाढता विरोध : दाणाबाजार, बाजार समितीमध्ये शुकशुकाट, दालमिलची चाके थांबली

विजयकुमार सैतवाल

जळगाव : नॉन ब्रँडेड धान्यावर पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याच्या निर्णयाविरुद्ध शनिवार, १६ जुलै रोजी जळगावातील दाणाबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच दालमिल बंद ठेवून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. यामुळे जळगावात एकाच दिवसात ७० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. या बंदमुळे दाणाबाजार, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता तर दालमिलची चाकेदेखील थांबली होती. 

नॉन ब्रँडेड धान्य, डाळी तसेच इतर खाद्यान्न वस्तूंवर  पाच टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये  घेण्यात आला व त्याची अंमलबजावणी १८ जुलैपासून होणार असल्याने या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम व्यापाऱ्यांसह शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी देशव्यापी बंद पुकारला असून त्यात जळगावातील दाणाबाजार, बाजार समिती बंद ठेवण्यासह दालमिल चालकांनीदेखील बंद पाळला. 

एकाच दिवसात करोडो रुपयांचा फटका

जळगावातील दाणाबाजारातून केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण खान्देश, विदर्भ व मराठवाड्यात येथून माल जातो. त्यामुळे दिवसभरात येथे करोडो रुपयांची उलाढाल होत असते. या शिवाय जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य बाजारातदेखील दररोज ठिकठिकाणाहून धान्य, कडधान्य, डाळींची आवक तसेच विक्री होत असते. मात्र शनिवारच्या बंदमुळे दोन्ही ठिकाणी व्यवहार न झाल्याने करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. डाळींचे उत्पादन थांबले

जळगावातील दालमिलमध्ये मोठ्या प्रमाणात डाळींचे उत्पादन होऊन ती देशासह विदेशातही निर्यात होत असते. ७५ दालमिलच्या माध्यमातून दररोज जवळपास एक हजार टन डाळींचे उत्पादन येथे होत असते. मात्र शनिवारी दालमिल बंद ठेवण्यात आल्याने डाळींचे उत्पादन थांबले. त्यामुळे दाणाबाजार, बाजार समिती व दालमिलमधील पूर्ण उलाढाल ठप्प होऊन ७० करोड रुपयांचा फटका बसला. 

१०० टक्के बंद

नॉन ब्रँडेड धान्य, डाळीवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय म्हणजे व्यापारी, शेतकरी, सामान्य नागरिक यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेला बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचेदेखील सांगण्यात आले. यामुळे करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून सरकारने याचा विचार करावा व आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा, दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पागरिया, उपाध्यक्ष अशोक धूत, सचिव मुकेश लोटवला, जळगाव जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक राठी, शशिकांत बियाणी यांनी केली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावGSTजीएसटीGovernmentसरकार