शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दिवसा बसतात चटके, रात्री पडते गुलाबी थंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 17:06 IST

ऑक्टोबर हीट : रात्री व दिवसाच्या तापमानात १७ अंशाचा फरक

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : मान्सून आता जवळ-जवळ परतला असल्याने वातावरणात ऋतुमान बदलाचे संकेत आता दिसू लागले आहेत. पावसाळा संपल्याने आता हळूहळू तापमानात बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाचा पारा ३६ ते ३७ अंशावर असल्याने दिवसा उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. मात्र, रात्री आता तापमानात घट होत असून, रात्रीच्या वेळेस नागरिकांना गुलाबी थंडीची चाहूल आता लागायला सुरुवात झाली आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांत रात्रीच्या तापमानात चांगलीच घट होत असून, १ ते २ ऑक्टोबरदरम्यान रात्रीचे २३ ते २४ अंश असलेले तापमान रविवारी १८ अंशावर आला होता. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पहाटे चार ते सात वाजेदरम्यान चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. दरम्यान, आगामी आठवडाभरात रात्रीच्या तापमानात आणखीन घट होऊन, पारा १६ ते १८ अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर २० ऑक्टोबरनंतर रात्रीचे तापमान १४ ते १६ पर्यंत घसरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. अजून काही दिवस दिवसाच्या तापमानात फार काही घट होण्याची शक्यता कमी असली तरी रात्रीच्या तापमानात मात्र घट पाहायला मिळू शकते.

ऋतुमान संक्रमनाचा आरोग्यावर परिणाम

दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च, जून व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये ऋतुमान बदलत असते. सद्य:स्थितीत पावसाळा संपल्यानंतर आता हिवाळ्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे तापमानात बदल पहायला मिळत आहे. बदलत्या ऋतुमान संक्रमनाचा परिणाम आता आरोग्यावरदेखील होत आहे. दिवसा जास्त तापमान व उकाडा, रात्री मात्र अल्हाददायक गारवा दोन प्रकारच्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या बदलत्या हवामानाचा लहान मुले व ज्येष्ठांवर होत असतो, त्यामुळे बदलत्या हवामानाच्या काळात लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी ठेवणे गरजेचे असते. कारण, सद्य:स्थितीत दिवस व रात्रीच्या तापमानात १६ ते १७ अंशाचा फरक जाणवत आहे.

गेल्या पाच दिवसांतील रात्रीच्या तापमानात झालेली घटदिनांक - रात्रीचे तापमान

४ ऑक्टोबर - २४ अंश५ ऑक्टोबर - २३.६ अंश

६ ऑक्टोबर - २१ अंश७ ऑक्टोबर - १९ अंश

८ ऑक्टोबर- १८.६ अंश 

टॅग्स :Heat Strokeउष्माघात