शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमध्ये रोज मौजमजा, मद्याची पार्टी... अन् जुना कामगारच निघाला चोर

By सागर दुबे | Updated: May 9, 2023 15:54 IST

तीन तरूण काही दिवसांपासून दररोज मौजमजा करीत असून दारूवर प्रचंड खर्च करीत आहेत, अशी माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.

जळगाव : संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून एमआयडीसी परिसरातील एच.डी.फायर कंपनीमध्ये प्रवेश करून १ लाख ४५ हजार ३०० रूपयांचा माल लांबविणा-या जुन्या कामगारासह त्याच्या दोन साथीदारांना सोमवारी रात्री कुसूंबा व सुप्रिम कॉलनी परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी त्यांना न्यायाधीश जे.एस.केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मंगळवार, दि. २ मे रोजी मध्यरात्री एमआयडीसी येथील एच.डी.फायर कंपनीच्या संरक्षक भिंती खाली खड्डा खोदून चोरट्यांनी कंपनीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर १ लाख ३२ हजार ३०० रूपये किंमतीचे मिडल एल्बो आणि १३ हजार रूपये किंमतीचे एनगॉट ब्राँझ धातूच्या पट्टया चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहन कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्या दिवसापासून पोलिस चोरट्यांचा शोध घेत होते.तिघांचे नाव निष्पन्न होतोच शोध सुरू...एच.डी.फायर कंपनीमध्ये गेल्या दोन महिन्यांपूर्वी काम सोडून गेलेला कामगार देवानंद उर्फ देवा गोकूळ कोळी (रा. रामेश्वर कॉलनी) याने त्याचे मित्र विक्की आत्माराम कोळी (३२) व ईश्वर श्रावण महाजन (३४, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी लागलीच तिघांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

दारूवर प्रचंड खर्च...तीन तरूण काही दिवसांपासून दररोज मौजमजा करीत असून दारूवर प्रचंड खर्च करीत आहेत, अशी माहिती एमआयडीसी पोलिसांना सोमवारी रात्री खब-याकडून मिळाल्यानंतर रात्रीच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यावेळी तिघांची चौकशी केल्यानंतर तिघांमध्ये एक चोरी करणारा जुना कामगार आणि त्याचे दोन्ही साथीदार असल्याची बाब समोर आली. कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी देवानंद हा कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे त्यानेच चोरीचा प्लॅन तयार केल्याची माहिती साथीदारांनी दिली.यांनी केली कारवाईएमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, किरण पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, ललित नारखेडे यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव