चोपडा : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, असे आमच्या लक्षात आले आहे. शेतकरी हवालदिल झाल्याने आत्महत्या करत आहेत.योजना या कागदावरच दिसत आहेत, सर्वच योजनांच्या लाभापासून तालुक्यातील शेतकरी वंचित राहिल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असे निवेदन मनसेतर्फे येथील तहसीलदारांना देण्यात आले.४ रोजी दुपारी २ वाजता तहसील कार्यालयात नायब तहसीलदार महेश साळुंखे यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, दुष्काळी भागात शासनाने सवलती मंजूर केलेल्या जमीन महसूल सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती विषयक वसुलीला स्थगिती, कृषी वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थी परीक्षा फीमध्ये माफी, पिण्याचा पाण्यासाठी टँकरचा वापर, अश्या विविध लाभार्थींची यादी मिळावी, तसेच तालुक्यातील किती विहिरी अधिग्रहित केल्या, पशुधनाबाबत उपलब्ध चाऱ्याची माहिती सात दिवसाच्या आत उपलब्ध करून घ्याव्यात. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.या निवेदनावर मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखडे, मनसे विद्यार्थी सेना शहरप्रमुख निलेश बारी, कल्पेश पवार, दीपक पाटील, दीपक विसावे, अजय परदेशी, तुषार पाटील, निखिल पाटील, वीरेंद्र बोरसे, प्रशांत शेटे, मयूर पवार, दीपक परदेशी, सागर परदेशी, योगेश परदेशी, शुभम महाजन, अजय मोरे, सागर भोई, आदींच्या सह्या आहेत.
दुष्काळी योजनांची अंमलबजावणी त्वरीत करा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:44 IST
चोपडा तालुक्यात दुष्काळी योजनांची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी, अन्यथा मनसेस्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
दुष्काळी योजनांची अंमलबजावणी त्वरीत करा, अन्यथा आंदोलन
ठळक मुद्दे चोपडा तहसीलदारांना मनसेचे निवेदन योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप