शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा पुलाची तातडीने दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:53 IST

महामार्गावरील खड्डेही बुजविणार : सेनेच्या इशाऱ्यानंतर ‘नही’ला आली जाग

जळगाव : राष्टÑीय महामार्ग क्र.६ वर जळगाव ते एरंडोल दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवावे, तसेच धोकादायक बनलेल्या गिरणा नदीवरील पुलाची तातडीने दुरूस्ती करावी या मागणीबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यावर जागे झालेल्या ‘नही’ने खड्डे बुजविण्याची कार्यवाही तसेच गिरणा पुलाची दुरूस्ती तातडीने करण्याचे आश्वासन दिले.गिरणा नदीवरील पुल उंच असून त्यावरील काँक्रीट ब्लॉकमध्ये फटी निर्माण झाल्या असून वाहन जाताना पूल हादरत आहे. तसेच पुलावरील रस्त्याचे काँक्रीट उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या पुलावर कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने ‘नही’च्या अधिकाऱ्यांकडे केली. तसेच जळगाव ते एरंडोल या राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे चुकविताना अनेक वाहनांचे अपघात होऊन जिवीत हानी होत आहे. याकडे प्रशासनातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या राष्टÑीय महामार्गाची निविदा निघाल्याचे सांगितले जात आहे.मात्र या कामासाठी मोठा कालावधी उलटूनही कामास सुरूवात झालेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याआधीच गिरणावरील पुलाची तसेच जळगाव-एरंडोल महामार्गाची दुरूस्ती करावी. या कामास एक महिन्याच्या आत सुरूवात न झाल्यास शिवसेना ग्राहक कक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच काही दुर्घटना घडल्यास संबंधीत अधिकारी, ठेकेदाराविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.शिष्टमंडळात कक्षाचे जिल्हा प्रमुख गजानन मालपुरे तसेच जि.प. सदस्य प्रताप पाटील, चेतन शिरसाळे, हितेश शाह, राहुल नेतलेकर, नितीन सोनवणे, मंगला बारी, चेतन प्रभूदेसाई, लोकेश पाटील, विजय चौधरी, सागर कुटुंबळे, विजय सपकाळे, भैय्या वाघ, शैलेश गुरव, राहुल पाटील, ललित कोतवाल, सोहम विसपुते आदी उपस्थित होते.काम तातडीने करणारया संदर्भात ‘नही’च्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांनी सांगितले की गिरणा नदीवरील पुलाची स्वत: तपासणी केली असून पूल व्यवस्थित आहे. फक्त या पुलाच्या रस्त्यावरील वरचा थर उखडला गेल्याने खड्डे पडले आहेत. पावसामुळे ते दुरूस्त करता येत नव्हते. आता तातडीने शनिवार-रविवारी हा थर टाकून दुरूस्ती केली जाईल. तसेच महामार्गावरील खड्डे बुजण्याचे कामही तातडीने हाती घेतले जाईल.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव