भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे चुडामण नगर भागामध्ये जलकुंभाजवळ असलेला चार ब्रास वाळू व १२ ब्रास घेसू मातीचा साठा महसूल विभागाने जप्त केला. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.साकेगावात वाळू व गौण खनिज माती याचा साठा असल्याची गुप्त माहिती जळगावचे खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांना मिळाली. चव्हाण यांनी चुडामण नगर भागातील जलकुंभाजवळ वाळू चार ब्रास व घेसू माती गौणखनिज १२ ब्रास दोघे मिळून २४ हजारांच्या अवैध गौणखनिजाच्या साठ्यावर छापा मारला. साकेगावचे तलाठी हेमंत महाजन यांनी पंचनामा केला.महसूलची क्षणाक्षणाची खबरमहसूल खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांची शासकीय गाडी गावात प्रवेश करताच गावातील व ज्या ज्या ठिकाणी वाळूचे साठे आहे त्या त्या ठिकाणी अवैध गौणखनिज विकणाऱ्यांनी अलर्ट म्हणून एकमेकांशी फोनवर संवाद साधला व महसूल प्रशासनाच्या वाहनाची दशा व दिशेची क्षणाक्षणाची माहिती व वाहनामागे काही वाहन महसूल अधिकारी कोठे जात आहे? कोणाशी बोलत आहेत? याची माहिती देत होते. यामुळे अवैध गौणखनिज व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी गावालगतच तिघ्रे शिवारातही वाळू साठा जप्त करण्यात आला होता.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे गौणखनिजाचा अवैध साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 01:40 IST
साकेगाव येथे चुडामण नगर भागामध्ये जलकुंभाजवळ असलेला चार ब्रास वाळू व १२ ब्रास घेसू मातीचा साठा महसूल विभागाने जप्त केला. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे गौणखनिजाचा अवैध साठा जप्त
ठळक मुद्देकारवाईने वाळूमाफियांमध्ये खळबळमहसूलची क्षणाक्षणाची खबर२४ हजारांचा मुद्देमाल जप्त