शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक करणारे १७९ वाहने कारवाईविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:29 IST

प्रशासनाने जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर यासारखी १७९ वाहने पकडली आहेत. गेल्या सहा महिन्यापासून ही वाहने तहसील कार्यालय, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जमा आहेत. यापैकी १२० वाहनांना तर मालकच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ज्या ५९ वाहनांचे मालक निष्पन्न झाले, त्यांनीही या वाहनांकडे ढुंकून पाहिलेले नाही. त्यामुळे ही वाहने भंगारात विक्री होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे वाळूचे मायाजाल  १२० वाहनांचे तर मालकच निष्पन्न नाहीभंगारात लिलाव होणार?

जळगाव : प्रशासनाने जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर यासारखी १७९ वाहने पकडली आहेत. गेल्या सहा महिन्यापासून ही वाहने तहसील कार्यालय, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जमा आहेत. यापैकी १२० वाहनांना तर मालकच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ज्या ५९ वाहनांचे मालक निष्पन्न झाले, त्यांनीही या वाहनांकडे ढुंकून पाहिलेले नाही. त्यामुळे ही वाहने भंगारात विक्री होण्याची शक्यता आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनांविरुध्द तसेच वाळूविरुध्द प्रशासनाने वेळोवेळी कारवाया केलेल्या आहेत.प्रत्येक कारवायांमध्ये वेगवेगळे कारणे आहेत, असे असतानाही आज प्रशासनाच्या डोळ्यादेखत बंदी असतानाही शहर व जिल्ह्यात वाळूची वाहतूक होत आहे. सहा महिन्यात अवैैध वाळू वाहतूक करताना १७९ वाहने पकडण्यात आली व ही वाहने त्या-त्या तालुक्याच्या तहसील, प्रांताधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात देखील अवैध वाळू वाहतूक करणारे वाहने आहेत.ना क्रमांक, ना चेसीसपकडण्यात आलेल्या वाहनांमध्ये १२० वाहनांना क्रमांकच नाही. विना क्रमांकाचेच वाहने धावत होती. आणखी खोलात गेले तर या वाहनांना चेसीस क्रमांकही नसल्याचे उघड झाले. त्यामुळे वाळूमाफियांकडून अशीच वाहने व्यवसायात वापरली जातात. प्रशासनाने वाहने पकडली तर त्याच्या मुळ किमतीपेक्षा दंडाचीच रक्कम जास्त असते, त्यामुळे दंड भरण्याच्या नादात न पडता अशी वाहने वाºयावर सोडून दिली जातात. जप्त वाहनांची चोरीवाळू वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांची चोरी झाल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातून नेहमीच डंपर व ट्रॅक्टर चोरी झालेले आहेत. वारंवार वाहने चोरी होणे व त्याच वाहनांचा वाळू व्यवसायासाठी वापर होणे असे प्रकार अलीकडच्या काळात घडले आहेत, त्यामुळे प्रशासनाकडेच संशयाची सुई फिरायला लागली होती. वाहने चोरी प्रकरणात चालकांवरच गुन्हे दाखल झालेले आहेत. कारवाई करणाºयांनी असो कि तपासी अमलदारांनी मालकापर्यंत पोहचण्याची तसदी घेतलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव