शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

बेकायदा मद्याचा साठा, तिघांना अटक

By admin | Updated: April 22, 2017 00:24 IST

सहाय्यक पोलीस अधीक्षकांची धडक मोहिम : तीन ढाब्यांसह हॉटेलवर कारवाईने खळबळ

भुसावळ : बेकायदा मद्याचा साठा करणाºया तिघा हॉटेल्ससह ढाब्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी टाकलेल्या छाप्यात देशी-विदेशी असा ३० हजारांचा साठा जप्त करीत तिघांना अटक करण्यात आली.भुसावळ-जळगाव रस्त्यावरील नशिराबाद टोल नाक्याच्या अलिकडे झालेल्या कारवाईने हॉटेल व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे़ परमीट रूम व वाईन शॉप बंद झाल्यानंतर हॉटेल व ढाबे  चालकांकडून ब्लॅकमध्ये दारू विकली जात असल्याची माहिती मिळाली. छापा टाकून कारवाई करण्यात आली़पहिली कारवाई हॉटेल रसोईवर करण्यात आली़ पाच हजार ५४८ रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली तर गुणवंत प्रल्हाद कोल्हे (वय २५, असोदा, जळगाव) यास अटक करण्यात आली तर हॉटेल मालक राहुल सुरेश धांडे (जळगाव) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला़दुसरी कारवाई गारवा ढाब्यावर करण्यात आली़ २० हजार ५० रुपयांची दारू जप्त करण्यात आली तर मुरलीधर सोमा पाटील (वय ५४, नशिराबाद) यास अटक करण्यात आली़तिसरी कारवाई दयावान ढाब्यावर करण्यात आली़ संतोष मोहन वाघ (वय २९, सुरभी चौक, नशिराबाद) यास अटक करण्यात आली तर चार हजार ९४५ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला़ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपनिरीक्षक युवराज अहिरे, एएसआय दिलीप कोळी, हवालदार प्रदीप पाटील, संदीप चौव्हाण, राजेश काळे, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, राहुल चौधरी, सुधीर विसपुते, अयाज सैय्यद, असमद सैय्यद आदींच्या पथकाने केली़  एकूण ३० हजार ५४३ रुपयांचा मद्य साठा जप्त करण्यात आला़ कल्याण मटका घेताना शहरात दोघांना अटकभुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगवाली चाळ भागात कल्याण मटका घेताना  संशयीत आरोपी शेख इरफान व एजाज मो़रशीद यांच्याकडून  दोन हजार १६० रुपयांचे सट्टा-जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले़ मोहम्मदविरुद्ध संदीप चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल आहे़ दुचाकी घसरली, एक जण गंभीर जखमीभुसावळ- भुसावळ-जामनेर रस्त्यावरील कुºहे पानाचे गावाजवळ दुचाकी (एम़एच़१९ सी़जी़३४४२) घसरल्याने किशोर लुटे (कुºहेपानाचे) हे गंभीररित्या जखमी झाले़ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमी लुटे यांना जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले़  चोरीच्या उद्देशाने फिरणाºया दोघांना अटकभुसावळ- सराफा बाजारात चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरणाºया  शेख सुलतान शेख मस्तान (वय २३, कंडारी) व जय रणजित बालवंश (१९, पीओएच कॉलनी, भुसावळ) यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली़