अवैध गोवंश वाहतुकीचा ट्रक खड्ड्यात सोडून चालक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 05:28 PM2020-11-29T17:28:22+5:302020-11-29T17:28:29+5:30

कर्जोदजवळील घटना : गोवंशप्रेमींनी पाठलाग केल्याने २० गुरांची सुटका, क्लिनरला पकडले

Illegal cattle transport truck leaves the driver in the pit | अवैध गोवंश वाहतुकीचा ट्रक खड्ड्यात सोडून चालक पसार

अवैध गोवंश वाहतुकीचा ट्रक खड्ड्यात सोडून चालक पसार

Next

रावेर : मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरकडून रावेरच्या दिशेने भरधाव वेगात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या मिनीट्रकची (एम पी - ०८ /जीए १६७९) भनक अज्ञात गोवंशप्रेमींना  लागल्याने त्यांनी सदरील वाहनावर दगडफेक करीत पाठलाग केल्याने,  या चालकाने कर्जोद फाट्यावरील वळणावर हा मिनीट्रक रस्त्याच्या कडेला खोल  खड्ड्यात उतरवून पलायन केले. तथापि, जमलेल्या संतप्त जमावाने कडब्याच्या गंजीत दडलेल्या क्लिनरला बाहेर काढून पोलीसांच्या स्वाधीन केले.  ही घटना दि २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेेच्या सुमारास घडली. 
रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला व कत्तलीसाठी जाणार्‍या २० गोवंशातील गोर्‍ह्यांची सुटका करण्यात यश प्राप्त झाले असून  सव्वा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
 फौजदार मनोज वाघमारे, पोहेकॉ तडवी, राठोड, पोना नितीन डामरे ,पो कॉ मंदार पाटील, पोकॉ पुरूषोत्तम पाटील आदी सहकारी व दंगा नियंत्रण पथकाचे प्लाटून घेवून घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. 
पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने सदर मिनीट्रक खोल दरीतून बाहेर काढून रावेरकडे मार्गस्थ केला.
 पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळून, कत्तलीसाठी जाणार्‍या सव्वा पाच लाख मतीचे २०  गोवंशातील गोर्‍हयांची सुटका करून त्यांची रवानगी थेट कुसूंबा येथील बाफना गोशाळेत रवानगी करण्यात आली. 
दरम्यान, पाच लाख रुपये         किमतीचा मिनीट्रक जप्त करण्यात आला आहे.   

Web Title: Illegal cattle transport truck leaves the driver in the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.