शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

इकरा थीम महाविद्यालयाला नॅकची ‘बी प्लस’ श्रेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:44 IST

जळगाव - शहरातील इकरा शिक्षण संस्थाद्वारा संचलित एच.जे.थीम वरिष्ठ महाविद्यालयास बैंगलोर येथील नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रीडेशन कौसिल या संस्थेच्या ...

जळगाव- शहरातील इकरा शिक्षण संस्थाद्वारा संचलित एच.जे.थीम वरिष्ठ महाविद्यालयास बैंगलोर येथील नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रीडेशन कौसिल या संस्थेच्या राष्ट्रीय स्तराच्या पथकाने नॅक मूल्यांकनासाठी नुकतीच भेट दिली होती. या समितीने केलेल्या मूल्यांकनात महाविद्यालयास ‘बी प्लस’ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे.राष्ट्रीय स्तराच्या पथकामध्ये मदुराई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ व्ही़मुरगेसन, इंदोरमधील अहिल्या विश्व विद्यायाच्या आयटी विभागाच्या प्रमुख डॉ़ वृंदा टोकेकर, मडगाव येथील चौगुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ नंदकुमार सावंत यांचा समावेश होता. या समितीकडून काही महिन्यांपूर्वीच महाविद्यालयास भेट देऊन एऩएस़एस व क्रीडा तसेच विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेऊन परिक्षण केले होते. त्यानंतर मॅनेजमेंट, विभागप्रमुख, पालक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सभा घेऊन महाविद्यालयाच्या पुढील प्रगतीबद्दल सविस्तर चर्चा केली होती.मुस्लिम विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाची टक्केवारी वाढलीनॅकची श्रेणी प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयता एक्झिट बैठक झाली़ त्यामध्ये प्रा. व्ही़ मुरगेसन यांनी महाविद्यालय फक्त अल्पसंख्यांक नाही तर इतर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत राष्ट्रीय एकात्मतेचे उत्कृष्ट काम करित आहे, असे मत व्यक्त केले. सोबत जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम विद्यार्थिनींची उच्च शिक्षण घेण्याची टक्केवादी सुध्दा वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.या बैकीला संस्थाध्यक्ष डॉ़ करिम सालार, डॉ़ अंजली कुलकर्णी, हाजी गफफार मलिक, इकबाल शाह, प्राचार्य डॉ. सैय्यद शुजाअत आदींची उपस्थिती होती़ तसेच नॅकच्या यशाकरिता या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव