शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

जयप्रकाश नारायण यांची भाजपा सरकारकडून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 12:40 IST

घरचा आहेर: लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष पांडे यांची खंत

ठळक मुद्देसन्मानाच्या विषयावर सरकार गंभीर- गिरीश महाजनप्रश्न मार्गी लागेल- एकनाथराव खडसे
जळगाव- लोकनायक जयप्रकाश नारायण यांची भाजपा सरकारकडून उपेक्षा होत आहे, अशी खंत अ. भा. लोकतंत्र सेनानी संघाचे प्रांताध्यक्ष आणि रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयप्रकाश पांडे (नागपूर) यांनी येथे व्यक्त केली. गुरुवारी 23 रोजी सकाळी 11 वाजता येथील आयएमए सभागृहात लोकतंत्र सेनानी संघातर्फे मीसा राजबंदी व सत्याग्रही कार्यकत्र्याचा मेळावा आयोजित केला होता. या उत्तर महाराष्ट्रस्तरीय मेळाव्यात पांडे बोलत होते. स्वागताध्यक्ष आमदार सुरेश भोळे हे होते. व्यापीठावर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे, सेनानी संघाचे प्रांत संघटक सुरेशराव सायखेडकर, आमदार उदयसिंग पाडवी, आमदार बाळासाहेब सानप (नाशिक) यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी पांडे म्हणाले की, जे लोक आणीबाणी विरुद्ध जेल मध्ये गेले. ते जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी प्रेरीत झाले होते. हुकूमशाही विरुद्ध लढा देत लोकशाहीसाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. त्या सर्व मीसा राजबंदी सत्याग्रहींना देशातील स्वातंत्र्य लढय़ातील सैनिकांप्रमाणे सन्मान व मानधन दिले जावे अशी मागणी आहे. मात्र आपल्या विचारांचे भाजपाचे सरकार येवून तीन वर्षे उलटली तरी मागणी मार्गी लागेली नाही. यामुळे या सरकारकडून जयप्रकाश नारायण यांची उपेक्षा होत आहे, अशी खंत व्यक्त करीत इतर सात राज्यात मीसा राजबंदी सत्याग्रहींना देशातील स्वातंत्र्य लढय़ातील सैनिकांप्रमाणे सन्मान करुन मानधन दिले जात असल्याचाही उल्लेख केला. तर गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे आभार मानत तातडीने यावर निर्णय चांगला निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. याच विषयावर सांगली येथे 26 रोजी महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सन्मानाच्या विषयावर सरकार गंभीर- गिरीश महाजनआणीबाणीच्या काळात अनेकांनी लढा दिला म्हणूनच लोकशाही जिवंत राहिली अन्यथा आज वेगळे चित्र दिसले असते. त्याकाळी जे लोकतंत्र सेनानींनी धाडस दाखवले त्यामुळे हळूहळू विचारांच प्रसार होत आज आपले सरकार आले तसेच छोटे कार्यकर्तेही मंत्री झाले. याची जाणीव सरकारला असून लोकतंत्र सेनानींचा योग्य सन्मान केला जाईल व मानधनही दिले जाईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुकूल असून आपला पाठपुरावा सुरु असून लवकरच चांगला निर्णय लागलेला दिसेल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वस्त केले. प्रश्न मार्गी लागेल- एकनाथराव खडसेदेशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक चांगल्य योजना आणल्या व धाडसी निर्णयही घेतले परंतु हळू हळू त्यांच्यात हुकूमशाही वृत्ती येत गेली. याचाच परिपाक आणिबाणीत झाला. याविरुद्ध अनेकांनी मोठय़ा हिमतीने जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला. जेलमध्ये गेल्याने अनेकांच्या नोक:या गेल्या. व्यवसाय ठप्प झाले. असा त्याग करणारे लोकतंत्र सेनानी यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी स्वकीयांविरुद्ध आंदोलन पुकारले. स्वातंत्र सेनानींनी परकीयांविरूद्ध आंदोलन छेडले होते. त्यामुळे लोकतंत्र सेनानी यांचे कार्यदेखील जवळपास त्याच तोडीचे असल्याने आपण मुख्यमंत्र्यांकडे यासर्वाना सवलती मिळाव्या, मानधन मिळावे अशी मागणी केली आहेश अशी माहिती देत आमदार एकनाथराव खडसे यांनी पुन्हा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. व हा प्रश्न मुख्यमंत्री मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक उदय भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विश्वास कुलकर्णी यांनी केले. यावेळी माजी आमदार धरमचंद चोरडिया, लखन भतवाल, मदनलाल मिश्र (धुळे) यांच्यासह सर्व सत्याग्रहीचा सत्कार करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील लोकतंत्र सेनानी यांच्या आठवणींवरील पुस्तक काढण्याचे यावेळी ठरले.