शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

जळगावला आले म्हणजे भरीत-भाकरीच्या मेनूचा मोह होणारच...

By विलास.बारी | Updated: November 27, 2017 18:21 IST

जळगाव जिल्ह्यात हिवाळ्यात होते सर्वत्र भरीत पार्टीचे आयोजन

ठळक मुद्देकपाशीच्या काड्यांवर भाजलेल्या वांग्यांची चवच न्यारी...ठेचा, कांद्याची पात यामुळे भरीत होते रुचकरकळण्याची भाकरी व पुरीमुळे भरीताला स्वादभरीताचा मेनू पुण्या-मुंबईपर्यंत

आॅनलाईन लोकमतजळगाव : दि.२७ : सोनं आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात तुम्ही हिवाळ्यात पर्यटन किंवा कामाच्या निमित्ताने आलात तर कळण्याची भाकरी आणि भरीताचे रुचकर जेवण घेण्याचा मोह तुम्ही आवरू शकणार नाही. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत जळगावात शेतात सर्वत्र भरीत पार्टीची धूम असते. थेट पुणे, मुंबई व इंदूरपर्यंत पोहोचणाºया भरीताच्या वांग्यांमुळे जळगावातील अनेक गावांचे अर्थकारण बदलले आहे.बामणोदची वांगी भरीतासाठी प्रसिद्धजळगावात भरीतासाठी वांगी बामणोदच्या शेतात पिकलेली निवडली जातात. बामणोद हे भुसावळ-यावल रस्त्यावरीले एक छोटेसे गाव आहे. या ठिकाणावरून वांगी मोठ्या प्रमाणात थेट मुंबई-पुण्याला रवाना केली जातात. स्थानिक बाजारात ४० रुपये किलो दराने मिळणारी ही वांगी, मुंबई-पुण्यात ६० ते ८० रुपये किलो दराने विकली जातात. वाग्यांमुळे या लहानशा गावाचे अर्थकारणही बदलत चालले आहे. जळगाव जिल्ह्यातील तापीकाठावरचे सर्वच तालुके ही वांगी पिकवतात. विदर्भातल्या थेट मलकापूरपर्यंत ही वांगी आता सहज उपलब्ध होताना दिसतात.

कपाशीच्या काड्यांवर भाजलेल्या वांग्यांची चवच न्यारी...भरतासाठी वांगी भाजावी लागतात. पण हेच वांगी कापसाच्या काड्यांवर भाजले तर त्या भरीताला खरी चव येते. भाजण्यापूर्वी वांग्यांना स्वच्छ काट्याने छिद्रे पाडून घ्यावे. काड्यांच्या आगीत १५ ते २० मिनिटांत वांगी भाजली जातात. भाजलेली वांगी एका मोठ्या परातीत ठेवून त्यांचे काळे झालेले साल काढायचे. चांगल्या दर्जाच्या वांग्यांना भाजल्यानंतर भरपूर तेल सुटते.

ठेचा, कांद्याची पात यामुळे भरीत होते रुचकरसाल आणि देठ काढलेला वांग्यांचा गर एका लाकडी (बडगी) भांड्यात टाकला जातो. हा गर लाकडाच्याच मुसळासारख्या वस्तूने ठेचला जातो. त्यामुळे तो गर एकजीव होतो. ठेचून एकजीव झालेल्या वांग्याच्या गराला फोडणी दिली जाते. फोडणीत तिखटाऐवजी भाजलेल्या मिरचीचा ठेचा टाकला जातो. त्यासाठी तिखट लवंगी मिरची वापरली जाते. तिखट असलेले भरीत थंडीत रुचकर लागते. कांद्याची पात भरतासाठी अत्यावश्यक असते. हिरवी पात चिरून तिही भरीतात टाकली जाते. त्या पातीचे कांदे जेवतांना खातात. खोबरे, शेंगदाणे हे फोडणीच्या वेळी तर ठेचलेला लसूण फोडणी दिल्यानंतर भरीतात टाकली जाते.

कळण्याची भाकरी व पुरीमुळे भरीताला स्वादखान्देशात भरीताबरोबर कळण्याची भाकरी किंवा पुरी केली जाते. (कळणे म्हणजे ज्वारी आणि उडीद यांचे मिश्रण करून तयार केलेले पीठ). साधारण १ किलो ज्वारीत २०० ते २५० ग्रॅम उडीद टाकल्यानंतर कळणे तयार होते. सोबतीला तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोशिंबीर, मुळा व टोमॅटो या मेणूची लज्जत वाढवितो.

भरीताचा मेणू पुण्या-मुंबईपर्यंतजळगाव तालुक्यातील आसोदा या गावातील आचारी भरीत तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील काही तरुणांनी जळगाव शहरात भरीत सेंटर सुरु केले आहेत. या ठिकाणचे भरीत पुणे, मुंबई, इंदौरपर्यंत पोहचविले जाते.

भरीताची वांगी केवळ जळगावातचजळगाव जिल्ह्यात पिकणाºया या वांग्यांची लागवड अन्य ठिकाणी होत नाही. त्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला तर जळगावच्या भरीतचा चव देखील येत नाही. या जातीवर संकर करण्याचा प्रयत्नही झाला आहे; पण संकरित वांग्यांमध्ये ती चव आली नाही.

टॅग्स :Jalgaonजळगावfoodअन्न