शिव संपर्क अभियानाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सायंकाळी शिवसंपर्क अभियानाअंतर्गत सेना सदस्य नोंदणी मोहीम कार्यक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, डॉ. दिनकर पाटील, चतुर पाटील, रोहिदास पाटील, जितेंद्र पाटील, अरुण पाटील, दयाराम पाटील, प्रा. आर. बी. पाटील, अशोक मराठे, डॉ. राजेंद्र पाटील, मधुकर पाटील, प्रा. बी. एन. पाटील, प्रेमानंद पाटील, विकास बोरसे, समीर पाटील, भिकान महाजन, बापू महाजन, चेतन पाटील उपस्थित होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, हा काळ कार्यकर्ता निवडणुकीचा आहे. प्रत्येक निवडणूक ताकदीने लढू. कमजोर जागी लक्ष देऊन ती जागाही जिंकण्याचा प्रयत्न करू, तर पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी शहरातील कार्यकत्यांनी सक्रिय राहावे, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली.
सूत्रसंचालन व आभार प्रा. आर. बी. पाटील यांनी मानले.
पूरग्रस्तांसाठी दिला निधी
राज्यात महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यासाठी शिवसेनेच्यावतीने मदतनिधी गोळा केला जाणार आहे. यासाठी व्यक्तिगत ५१ हजारांचा निधी देत आहे, अशी घोषणा या वेळी आमदार पाटील यांनी केली.