शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वृक्ष लागवड टाळली तर होणार फौजदारी!

By admin | Updated: October 5, 2015 00:30 IST

घरासमोर वृक्ष लागवड केलेली नाही, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूदही संबंधित आदेशात आह़े या आदेशाची अंमलबजावणी लवकरच धुळे मनपा करणार आह़े

धुळे : ले-आऊटला परवानगी देण्यापूर्वी अकृषक प्लॉटच्या सर्व बाजूंनी तसेच घराचे बांधकाम करताना घरासमोर आधी वृक्ष लागवड केल्याशिवाय बांधकामाला या पुढे परवानगी देता येणार नाही, असे आदेश राज्य शासनाने नुकतेच काढले आहेत़ शिवाय ज्यांनी घरासमोर वृक्ष लागवड केलेली नाही, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूदही संबंधित आदेशात आह़े या आदेशाची अंमलबजावणी लवकरच धुळे मनपा करणार आह़े

पर्यावरणाचा होणारा :हास थांबविण्यासाठी राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत़ शहरी तसेच ग्रामीण भागात ले-आऊटला परवानगी देण्यापूर्वी या अकृषक प्लॉटच्या सर्व बाजूंनी तसेच घराचे बांधकाम करताना समोर वृक्ष लागवड केल्याशिवाय बांधकामाला परवानगी देता येणार नाही, दिल्यास संबंधित अधिका:यांवरही कारवाई होणार आह़े

वर्षाला 1500 परवानगी

महापालिकेकडून वर्षभरात 1 हजार ते 1 हजार 500 बांधकामांना परवानगी दिली जात़े मात्र अनेकांकडून दबावतंत्राचा अवलंब करून परवानगी घेतली जाते, अनेकदा कागदपत्रेदेखील अपूर्ण सादर केली जातात़ मात्र या नवीन निर्णयामुळे या सर्व बाबींना चाप बसणार आह़े घराच्या आजूबाजूला वृक्षलागवड केल्याचे फोटोदेखील बांधकाम परवानगी घेताना सादर करावे लागणार आहेत़

ग्रामीण भागातही वनांची हानी

ग्रामीण भागात एकत्र कुटुंब व्यवस्था संपुष्टात येत असतानाच शेतीचेही तुकडे पडत आहेत़ त्यातून वृक्षतोडीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत आह़े त्याचबरोबर ज्यांच्यावर जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तेच जंगलाचे वैरी होत चालल्याचेही दिसून येत आह़े मानवाच्या भौतिक सुखापोटी वाढत्या वस्त्यांमुळे आणि रस्त्यांच्या रुंदीकरणात वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आह़े अनेक ठिकाणी तर झाडाची कत्तल करण्यासाठी झाडाच्या बुंध्यामध्ये विस्तव टाकून वृक्ष जाळण्याचे प्रमाण वाढले आह़े शिवाय महामार्गाच्या कामातही वृक्षांची बेसुमार कत्तल होत आह़े

मनपाला ‘नो उल्लू बनाविंग’

महापालिका हद्दीत वृक्षतोड करण्यापूर्वी मनपा वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेणे आवश्यक असत़े मात्र वृक्ष प्राधिकरण समिती नावालाच असल्याने नागरिकांच्या अर्जावर लवकर कार्यवाही होत नाही़ परिणामी नागरिक परवानगीची वाट न पाहताच वृक्षतोड करतात़ एका वृक्षतोडीसाठी परवानगी घेतली, तरी अनेक वृक्षांची कत्तल करतात़ शिवाय लाकूड तस्करीसाठीदेखील मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत़े परंतु शासनाच्या नवीन निर्णयामुळे वृक्ष तोडीसाठी रितसर परवानगी घेणे अनिवार्य असणार आह़े त्याचप्रमाणे एक वृक्ष तोडल्यास दहा वृक्षदेखील लावावे लागणार आहेत़ निसर्ग रक्षणासाठी शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याने कारवाई होणार आह़े

'' शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी करणे बंधनकारकच आह़े तशा सूचनादेखील नगररचना विभागाला दिल्या असून वृक्ष लागवड केल्याशिवाय बांधकाम परवानगी दिली जाणार नाही़''

-डॉ़ नामदेव भोसले, आयुक्त, मनपा, धुळे