शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीवेळी कुणबी प्रमाणपत्र असल्यास ‘ओबीसी’चा फायदा

By अमित महाबळ | Updated: November 19, 2023 14:58 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या फैजपूर येथे होत असलेल्या राज्य अधिवेशनासाठी केसरकर जळगावला आले होते.

अमित महाबळ, जळगाव : राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांना ओबीसीचा फायदा मिळेल. शिक्षकांची कमरता असल्याने शाळांवर जो परिणाम झाला आहे, तो गृहित धरता लवकरात लवकर भरती होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते रविवारी, सकाळी जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामृहात माध्यमांशी बोलत होते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या फैजपूर येथे होत असलेल्या राज्य अधिवेशनासाठी केसरकर जळगावला आले होते.

शिक्षकांची भरती प्रक्रिया व दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी यामुळे भरती प्रक्रियेवर काही परिणाम होईल का या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले, की भरती प्रक्रिया करत असताना अनेक ठिकाणी आरक्षित जागा या खुल्या प्रवर्गात टाकल्यामुळे खुल्या जागांची संख्या कमी झाली होती. आम्ही प्रयत्नपूर्वक या सर्वांची पाहणी करून खुल्या जागा वाढविल्या आहेत. याबाबत मराठा समाजाच्या संघटनांची देखील मागणी होती. यामुळे खुल्या प्रवर्गात पुरेशा जागा उपलब्ध झाल्या आहेत. ईडब्लूएस आरक्षणाचा फायदा या भरतीमध्ये मिळेल. तसेच मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. जे खुल्या प्रवर्गात आहेत, त्यांना त्यातून संधी आहेच मात्र, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळू शकेल, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले. टप्पा अनुदान; लक्ष घालण्याची सूचना

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित उपस्थित होते. प्रसाद यांनी पुण्याला असताना शिक्षणाच्या संदर्भात खूप चांगले काम केले. त्याच पद्धतीचे काम विशेषतः भाषा व गणिताच्या बाबतीत, जळगाव जिल्ह्यात केले आहे. त्याचा चांगला परिणाम शालेय शिक्षणात आढळून आला आहे. टप्पा अनुदानाच्या शाळांच्या संदर्भात अधिक लक्ष घालण्याची सूचना केली आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Educationशिक्षणTeacherशिक्षकOBCअन्य मागासवर्गीय जाती