शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फेलोशिप देणार नाही, तर संशोधन होणार कसे?

By अमित महाबळ | Updated: March 21, 2023 18:13 IST

जळगाव जिल्ह्यातून एका विद्यार्थिनीने प्रस्ताव पाठवूनही महाज्योतीकडून संशोधनासाठी फेलोशिप मिळत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे.

  जळगाव : भारतीय इतिहास, साहित्य, संस्कृती, विज्ञान आदी विषयांतील संशोधनाला चालना मिळावी म्हणून सरकार प्रोत्साहित करत असले तरी संशोधकांच्या मार्गातील अडथळे कमी नाहीत. जळगाव जिल्ह्यातून एका विद्यार्थिनीने प्रस्ताव पाठवूनही महाज्योतीकडून संशोधनासाठी फेलोशिप मिळत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे.

प्रीती राजेंद्र दातेराव (प्रीती शुक्ल) यांनी संस्कृत भाषेतील संशोधनासाठी फेलोशिप (वर्ष २०२२-२३) मिळावी म्हणून महाज्योतीकडे अर्ज केला. सप्टेंबर २०२२ मध्ये कागदपत्रांची पडताळणी महाज्योतीच्या कार्यालयात झाली. २ नोव्हेंबर २०२२ रोजी, अपात्र अर्जदारांची तात्पुरती यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दातेराव यांच्या नावापुढे १ जानेवारी २०२१ पूर्वीची नोंदणी असल्याचे कारण देण्यात आले होते.

विद्यापीठाचे महाज्योतीला पत्र -- हे प्रकरण विद्यापीठात आल्यावर उपकुलसचिव (संशोधन) वि. व. तळेले यांनी महाज्योतीला पत्र पाठवले. पीएच.डी.साठी अर्जदाराचा तात्पुरता प्रवेश दि. ३ नोव्हेंबर २०२० असला तरी आरआरसी ३० ऑगस्ट २०२१ रोजी, झाली आहे.

- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नियमावलीनुसार पीएच.डी. अभ्यासक्रमास तात्पुरत्या प्रवेशित विद्यार्थ्यांना एका सत्राचा प्री. पीएच.डी. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर व संशोधन मान्यता समितीसमोर (आरआरसी) सादरीकरण केल्यानंतर समितीच्या सभेचा दिनांक हा विद्यार्थ्याच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाचा प्रवेश कायम झाल्याचा दिनांक समजला जातो, असे पत्रात म्हटले आहे.

महाज्योतीकडून प्रतिसादाची प्रतीक्षा -विद्यापीठाच्या पत्रानुसार ३० ऑगस्ट २०२१ रोजीची मान्यता गृहीत धरून २०२२-२३ साठी पीएच.डी. फेलोशिप मंजूर करावी, अशी विनंती दातेराव यांनी महाज्योतीकडे केली. मात्र, त्यांना अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

अर्जदार म्हणतात... -फेलोशिपचे अर्ज २०२२-२३ या वर्षासाठी मागविण्यात आले होते. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी फेलोशिपची रक्कम मिळावी. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विहीत मुदतीत अर्ज व कागदपत्रे सादर केली. त्रुटीवर स्पष्टीकरण देणारे विद्यापीठाचे पत्र महाज्योतीला पाठविले आहे. या सर्वांची दखल घेतली जावी.- प्रीती राजेंद्र दातेराव (प्रीती शुक्ल), अर्जदार

टॅग्स :JalgaonजळगावStudentविद्यार्थीGovernmentसरकार