शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

"सोबत आला तर तो सेट, विरोधात गेला तर शूट हीच भाजपची नीती"; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

By विलास.बारी | Updated: November 3, 2022 17:55 IST

आमदार संजय शिरसाठ आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

जळगाव - शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून अनेकजण परतीच्या वाटेवर आहेत. त्यात आमदार संजय शिरसाठ आघाडीवर असून ते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. अनेकांना मंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतरही, त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याने आता शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही अंधारे यांनी सांगितले.

गुरुवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अंधारे बोलत होत्या. यावेळी युवासेनेचे विस्तारक शरद कोळी, शिवसेनेचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपकडून विरोधी पक्ष संपवण्याचा कुटील डाव खेळला जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.

भाजपावर जोरदार टीका

१. भाजपकडून देशातील स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना ईडीचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.२. भाजपसोबत गेला की भाजप त्याला सेट करतं, त्यांच्या विरोधात गेला तर शूट करते, हीच भाजपची नीती असल्याची टीका अंधारे यांनी केली.३. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सुरक्षा काढायची अन् अमृता फडणवीसांना सुरक्षा देण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचा टोला त्यांनी लगावला.४. जाती-धर्मांत विभागून जनतेत फूट पाडण्याचा भाजपचा कुटील डाव असून, हा डाव जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठीच महाप्रबोधन यात्रा काढण्यात आल्याची माहिती अंधारे यांनी दिली.५. संभाजी भिडे यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत केलेल्या गैरवर्तणुकीचा यावेळी अंधारे यांनी निषेध व्यक्त केला.

"त्या सत्तांतराचे मास्टरमाइंड फडणवीसच..."

रवी राणा व बच्चू कडू यांच्यात सुरू असलेल्या वादावर मध्यस्थी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. तसेच माझ्या एका फोनवर बच्चू कडू यांनी शिंदे गटाला समर्थन दिले, असे फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रातील त्या सत्तांतरात आमचा काहीही सहभाग नसल्याचे सांगणाऱ्या भाजपचा खरा चेहरा समोर आला असल्याचे अंधारे यांनी सांगितले. त्या सत्तांतराचे मास्टरमाइंड फडणवीसच होते, हे यावरून स्पष्ट झाल्याचेही अंधारे यांनी सांगितले.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपाSanjay Shirsatसंजय शिरसाटPoliticsराजकारण