शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

उद्घाटनानंतर आयसीयू पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 13:01 IST

जळगाव : कोविड रुग्णालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अतिदक्षता विभागाचा कोनशिला अनावरण करण्यात आले तसेच या ठिकाणी पाहणीही करण्यात ...

जळगाव : कोविड रुग्णालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अतिदक्षता विभागाचा कोनशिला अनावरण करण्यात आले तसेच या ठिकाणी पाहणीही करण्यात आली़ मात्र, त्यानंतर पुन्हा हा अतिदक्षता विभाग बंद करण्यात आला होता़ सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत तो बंदच होता़रुग्णालयात अतिदक्षता विभागांची क्षमता वाढवून अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर चांगले उपचार मिळावे, अशी व्यवस्था करण्यात येत आहे़ त्यातच दहा बेडच्या जुन्या अतिदक्षता विभागात नुतनीकरण करून त्या ठिकाणी त्याचा विस्तार करून १६ बेडचे प्रशस्थ आयसीयू तयार करण्यात आले आहे़व्हेंटीलेटर्सचेही इंस्टॉलेशन बाकी असून ही प्रक्रिया झाल्यानंतर एक ते दोन दिवसात हा अतिदक्षता विभाग रुग्णांच्या सेवेत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सा.बां. विभागाची काही कामे रखडली आहे.आक्षेप घेतलेले व्हेंटिलेटरपीएम केअर फंडातून आलेल्या व्हेंटिलेटरवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षय देवेंद्र मराठे यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यामधून शंभर टक्के पुरवठा होत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. हेच आक्षेप असलेले व्हेंटिलेटर या नूतनीकरण करण्यात आलेल्या आयसीयूमध्ये बसविण्यात आले आहेत. कनेक्टरमुळे या व्हेंटिलेटरचा डेमो रखडला होता.बेड कोंबले वॉर रूममध्येजुन्या आयसीमधून काढण्यात आलेले बेड हे आधी असलेल्या वॉररूममध्ये कोंबून ठेवण्यात आले आहेत़ सुरूवातीला ते बाहेरच पडलेले होते़ मात्र, उद्घाटनासाठी ते समोरील खोलीत ठेवण्यात आले आहे़

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव