शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कृतार्थ मी... यथार्थ मी... सेवार्थ मी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:30 IST

अवघ्या वारकरी संप्रदायात श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांची जी आरती म्हटली जाते त्या आरतीचे रचयिता म्हणून माझी म्हणजेच अ‍ॅड.गोपाल दशरथ चौधरी अशी ओळख असली तरी मुक्ताईरचित अभंगांचा अर्थ सोप्या स्वरूपात सांगण्याचे भाग्यदेखील मला मुक्ताई कृपेने लाभले आहे. तसेच काही लेखन अजूनही अप्रकाशित आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण या गावी दशरथ जीवराम चौधरी व गोदावरीबाई दशरथ चौधरी या दाम्पत्याच्या पोटी गोपाल चौधरी म्हणजे माझा २६ डिसेंबर १९५१ रोजी जन्म झाला. बालपणापासूनच माझ्यावर आध्यात्मिक संस्कारांचा पगडा आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण तत्कालिन तापी नदीकिनारी असलेल्या जि.प. शाळेत झाले. त्यानंतर आठवी ते अकरावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण चांगदेव येथील शाळेत झाले. बारावी ते बीएपर्यंतचे शिक्षण मध्य प्रदेशातील बºहाणपूर येथे घेतले. महाविद्यालयात असताना प्रा.वि.रा. गर्गे यांनी मराठी साहित्याविषयी मला मार्गदर्शन केले. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १९९३ मध्ये एलएलबी करून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव व औरंगाबाद येथील न्यायालयात वकिली केली. हे करत असताना १९९३ ते १९९८ दरम्यान दरवर्षी अ‍ॅटो ग्लान्स अ‍ॅडव्होकेट डायरीचे प्रकाशन केले. १९६८-६९ मध्ये तापी नदीकिनारी असलेल्या श्रीसंत मुक्ताई यांच्या गुप्तस्थळ मंदिरात राहणाऱ्या श्रीराम महाराजांशी माझा संपर्क आला. महाराज मंदिरात नेहमी ज्ञानेश्वरी, श्रीमद् भागवत कथा, संत तुकाराम गाथा, अमृतानुभव, एकनाथी भागवत यांचा सखोल अर्थ समजावून सांगत असत. घरातील आध्यात्मिक वातावरण आणि त्याला संत मुक्ताई मंदिरात होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची जोड मिळाल्याने माझा पिंड धार्मिकतेकडे वळू लागला. त्याचप्रमाणे मंदिरात राहणारे काशीनाथभाऊ यांनी मला श्रीमद् भगवद्गगीतेची संथा दिली. वयाच्या एकविसाव्या वर्षी १९७२ मध्ये संत मुक्ताई यांच्या अभंग व ओव्यांचे संकलन करून मी मुक्ताबाईंची कविता या पुस्तकाचे लेखन करून हे पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर १९७३ मध्ये चित्रमय श्रीक्षेत्र मेहुण ही फक्त फोटो असलेली पुस्तिका प्रकाशित करून संत मुक्ताईंचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू केले. त्याच वर्षी मुक्ता-मेहुण महात्म्य पुस्तिकेचे लेखन करून प्रकाशनही केले. त्याच पुस्तकात संत आदिशक्ती मुक्ताई यांची आरती प्रकाशित केली. याआधी मुक्ताईंची आरती नव्हती. इतर देवीदेवता आणि संतांची आरती मुक्ताईंच्या मंदिरात म्हटली जात असे. तेव्हा श्रीराम महाराज आणि काशीनाथभाऊ महाराज यांनी मुक्ताई आरती लेखन करण्याचे काम बाबूराव महाराज, टी.के. पाटील व माझ्यावर सोपविले. आम्ही तिघांनीही मुक्ताईंची आरती लिहिली. त्यापैकी मी लिहिलेली आरती मंदिरात रोज म्हटली जाऊ लागली. हिच आरती आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल वारकरी संप्रदायात मोठ्या श्रद्धेने म्हटली जात आहे. या आरतीचा रचियता म्हणून मला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर १९७८ ते १९८० दरम्यान एक साप्ताहिक काढून त्याचे यशस्वी संपादन केले. २००३ मध्ये माझ्या डोळ्यांनी माझी साथ सोडली. जवळ जवळ ९० टक्के मी आंधळा झालो. एवढे होऊनही मी माझ्यातल्या साहित्यिकाच्या पिंडाला कधी दूर लोटले नाही. आतापर्यंत असा ग्रंथ कोणी लिहिला नसल्याने हा ग्रंथ ऐतिहासिक झाला आहे व भाविकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजतागायत वयाची ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक ग्रंथांचे लेखन पूर्ण झाले असून ते सध्या अप्रकाशित आहेत. असे सोमेश्वर पुरातन : मेहुण महात्म्य ओवीबद्ध एकूण नऊ अध्याय, निंबाई पुराण ओवीबद्ध एकूण नऊ अध्याय, संत मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगांचे सार्थ विवरण, मराठी कवितासंग्रह मनोरथांचे मनोरे गीत आध्यात्म प्रमुख, हिंदी कवितासंग्रह गदीर्शे दौर प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणे, संस्कृत भक्तीवेध एका भागात १९८ श्लोक असे पाच खंड अशी पुस्तके लिहून तयार आहेत. यापुढेही जगलो तर ही लेखन सेवा मरेपर्यंत सुरूच राहील. मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण-चिंचोल या गावात मी राहत असून प्रसिद्धीपासून दूर असल्याने अनेकांना माझ्या साहित्याची कल्पनादेखील नसेल. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे मर्यादा आल्या आहेत. मुक्ताईंचे नामस्मरण हाच एक ध्यास शेवटच्या श्वासापर्यंत माझा राहील. यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे, असे मी समजतो.(शब्दांकन -डॉ.जगदीश पाटील)

टॅग्स :literatureसाहित्यMuktainagarमुक्ताईनगर