शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज, दुष्काळ आणि आजाराला कंटाळून मी आत्महत्या करतोय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 16:54 IST

दुर्देवी घटना : कढोली येथील वृध्द शेतकऱ्यांची विष घेऊन आत्महत्या

जळगाव- माझ्यावर एक लाख रूपयांचे पीक कर्ज व इलेक्ट्रीक मोटारीचे एक लाखाचे बील आणि मागील वर्षाचा दुष्काळ व आता सततच्या पावसामुळे पिंकांची झालेली नासाडी, एवढेच नव्हे तर विविध आजारांनी त्रस्त असून मी आत्महत्या करित आहे़़़अशी आशयाची चिठ्ठी लिहून एरंडोल तालुक्यातील कढोली येथील लक्ष्मण ओंकार पाटील (वय-७०) या कर्जबाजारी वृध्द शेतकºयाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान, वृध्द शेतकºयाचा मृतदेह हा वैजनाथ-कढोली गावाच्या रस्त्यावर आढळून आला आहे.याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.एरंडोल तालुक्यातील कढोली गावात लक्ष्मण पाटील हे पत्नी लिलाबाई व मुले हिंमत व लिलाधर यांच्यासह वास्तव्यास होते़ शेती काम करून ते घरचा उदरनिर्वाह करायचे. मात्र, मागील वर्षी दुष्काळ पडला सोबतच या वर्षी सततच्या पावसामुळे पिकांची नासाडी झाली. त्यामुळे लक्ष्मण पाटील हे नैराश्यात होते. सोबतच डोक्यावर कर्जाचे डोंगर आणि मुळव्याध व गुडघे दुखीच्या आजारामुळे ते त्रस्त झाले होते. त्यातच शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास लक्ष्मण पाटील हे गावाला जाऊन येतो, असे कुटूंबीयांना सांगून घराबाहेर पडले.वैजनाथ-कढोली रस्त्यावर आढळला मृतदेहवैजनाथ-कढोली गावाच्या रस्त्यावरून सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एक दुध विक्रेता जात असताना रस्त्याच्याकडेला कुणीतरी वृध्द व्यक्ती मयत स्थितीत पडून असल्याचे दिसले. त्याने त्वरित कढोली गावातील पोलीस पाटील रामदास सोनवणे यांना कळविले. नंतर सोनवणे यांनी त्वरित एरंडोल पोलिसांनी याबाबत माहिती दिली़ काही वेळानंतर वृध्द व्यक्ती ही कढोली गावातील लक्ष्मण पाटील असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना त्वरित जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतू, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाटील यांना तपासणीअंती मृत घोषित केले.सुसाईड नोट सापडलीमृतदेहाची झडती पोलिसांनी व नागरिकांनी घेतली असता खिशामध्ये सुसाईड नोट अर्थात आत्महत्यापूर्वी लिहीलेली चिठ्ठी आढळून आली आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे़ दरम्यान, पाटील यांच्या आत्महत्तेची बातमी गावात पसरताच ग्रामस्थांसह कुटूंबीयांची जिल्हा रूग्णालयात एकच गर्दी झालेली होती. याबाबत सीएमओ अपूर्वा चित्ते यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव