शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचा हट्ट पुरवला नाही अन् त्याने गळफास घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:17 IST

सिंधी कॉलनीतील घटना : लॉकडाऊनमुळे व्यवसायही चालत नसल्याने पालकांनी टेकले परिस्थितीपुढे हात

जळगाव : होय! आज परिस्थितीमुळेच एका तरूणाने आत्महत्या केली. आई-वडिलांना आपल्या मुलासाठी खूप काही करायचे होते. त्याला त्याने मागितली होती, तशी दुचाकीही घेऊन द्यायची होती. पण परिस्थितीने त्यांना हात टेकायला भाग पडले अन् आपला हट्ट पुरा न झाल्याने नैराश्याच्या भरातच त्यांच्या लाडक्या मुलाने स्वत:च्याच गळ्याभोवती फास आवळला. रविवारी सायंकाळी सिंधी कॉलनीत ही घटना घडली़ कमल भिषणचंद तुलसी (१८, रा़ सिंधी कॉलनी, मुळ रा़ फैजपूर) असे मयत तरूणाचे नाव आहे़भिषणचंद जसूमल तुलसी हे मुळचे फैजपूर येथील रहिवासी आहेत. वर्षभरापूर्वीच ते शहरातील सिंधी कॉलनी भागात कुटूंबासह राहण्यासाठी आले़ त्यांचे मालकीचे दीक्षित वाडीत स्पेअर पार्टचे दुकान आहे़ हे दुकान मुलगा कमल सांभाळत होता़ दरम्यान, काही दिवसांपासून कमल हा पालकांकडे सुमारे एक ते दीड लाखाची महागडी दुचाकी खरेदी करून देण्यासाठी हट्ट करीत होता़ परंतु, लॉकडाऊन असल्यामुळे व्यवसायही ठप्प झाला होता. परिस्थिती अतिशय नाजूक होती. त्यामुळे सध्यातरी महागडी दुचाकी नको. हळूहळू सगळं सुधारेल, त्यावेळी तुला हवी तशी दुचाकी घेऊन देऊ, असे आश्वासन पालकांनी त्याला दिले होते. पण, आपले आईवडिल आपला हट्ट पुरवू शकत नाही, हाच विचार त्याच्या मनात होता आणि त्यातून त्याला नैराश्य आले होते. रविवारी सायंकाळी त्याने सिंधी कॉलनीतील घरातच गळफास घेतला अन् जीवन संपवले.दरम्यान, आपल्या मुलाने गळफास लावून घेतल्याचे कळताच आईवडिलांनी एकच हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी त्याचा मृतदेह खाली उतरवला.आई-वडीलांना पाठविले पायमोजे घेण्यासाठीरविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास कमल याने आई-वडीलांना पायमोजे घेवून यावे, असे सांगितले़ त्यामुळे पालक सिंधी कॉलनी स्टॉपजवळ मुलासाठी पाय मोजे घेण्यासाठी गेले असता, कमल याने घरात कुणीही नसताना गळफास घेवून आत्महत्या केली़ आई-वडील घरी येताच त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच हंबरडा फोडला़ नंतर त्याला शेजारचाच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासणीअंती मृत घोषित केले़ रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला़ दरम्यान, कमल याच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी आहेत़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव