जळगाव : घरगुती कलहातून पती योगेश गौतम बि-हाडे (३०, रा. धनजीनगर, आसोदा) याने गुरुवारी रात्री वायरने गळा आवळून पत्नी सीमा (२५) हिचा खून केला आणि शुक्रवारी दुपारी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. सीमा दोन महिन्यांची गरोदर होती.सीमाचा चार वर्षांपूर्वी असोदा येथील योगेश बि-हाडे याच्याशी विवाह झाला होता़ योगेशच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, तर आई व भाऊ अहमदाबादला राहतात़ नवरा-बायको रोजंदारीवर मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करायचे.योगेशला दारूचे व्यसन असल्याने तो सतत पैशांची मागणी करायचा. अन्य घरगुती कारणांवरूनही त्यांच्यात लग्न झाल्यापासून वाद व्हायचे़ गुरुवारी पुन्हा वाद झाला व त्यातून योगेशने सीमाचा खून केल्याचे तिचे वडील विजय मोरे यांनी पोलिसांना सांगितले़सीमाचा खून केल्यानंतर योगेश त्याच्या असोद्यातील मेव्हणे अंकुश धनराज साळवे यांच्याकडे गेला़ सीमाला मारून आल्याचे त्याने अंकुशला सांगितले़ अंकुशने त्याला तालुका पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. रात्रीच दोघे तालुका पोलीस ठाण्यात निघाले़ पोलीस ठाण्यात पोहोचण्यापूर्वीच आसोदा रेल्वे गेटजवळ योगेश दुचाकीवरून उडी मारून पसार झाला.
गर्भवतीची हत्या करून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 04:00 IST