शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:43 IST

पत्नीने नशिराबाद पोलिसांकडे नोंदविला जबाब : कारागृह अधीक्षकांवर ठेवला गंभीर ठपका

जळगाव : शहर पोलीस ठाण्‍यात दाखल गुन्ह्यातील रवींद्र उर्फ चिन्या जगताप याचा ११ सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपास सुरू असून शुक्रवारी मयताच्या पत्नीने तिचे म्हणने जबाबातून नोंदविले. त्यात कारागृह अधीक्षकांवर गंभीर ठपका ठेवण्‍यात आला असून पतीचा मृत्यू हा कारागृहात पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचे जबाबात म्हटले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.११ सप्टेंबर रोजी रवींद्र उर्फ चिन्या जगताप याचा कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला होता. मृतदेह जिल्हा रूग्णालयात पोलिसांनी आणल्यानंतर पतीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप पत्नी मिनाबाई यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्‍यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली होती. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी नशिराबाद पोलिसांनी मिनाबाई यांना २५ सप्टेंबर रोजी समक्ष हजर राहून जबाब देण्‍यासाठी बोलविले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता पोलीस ठाण्‍यात राहून मिनाबाई यांनी हजर राहून जबाब नोंदविले.काय आहे जबाबातजबाबात मिनाबाई यांनी म्हटले की, ११ सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहात पतीला भेटण्‍यासाठी गेल्या असता, शिपाई कविता साळवे यांना त्यांनी पती कसे आहेत, असे विचारले, साळवे यांनी ते व्यवस्थित असल्याचे सांगितले आणि तुम्हाला भेटायचे असेल तर कोर्टाची ऑर्डर आणा असे सांगितले. नंतर मिनाबाई घरी निघून गेल्या. काहीवेळानंतर पतीचा मृत्यू झाल्याचे कळताचे त्यांनी कारागृहाकडे धाव घेतली. त्यांना चिन्याची तब्बेत खराब असल्याचे सांगून गोदावरी रूग्णालयात जाण्याचे सांगितले. नंतर गोदावरी रूग्णालयात आल्यानंतर त्यांनी पतीचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. मृतदेहाची पाहणी केली असता, डोळे उघडे होते, कपडे चिखलाचे भरलेले व फाटलेले होते. पूर्ण शरीर आलेचिंब झालेले. मारहाणीमुळे पाठ निळी पिवळी झालेली होती. डाव्या डोळ्याच्या खाली मार लागलेला होता. पोलीस मारतात त्याप्रमाणे अंगावर जखमा होता, असे मिराबाई यांच्या जबाबात म्हटले आहे.संबंधितांवर गुन्हा दाखलची मागणीकारागृह अधीक्षकांसह त्याठिकाणी उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी पतीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे, असेही जबाबात म्हटले आहे. त्यामुळे संबंधितांवर खूनाचा व पुरावा नष्‍ट केला म्हणून गुन्हा दाखल करण्‍यात यावा, अशीही मागणी त्यात करण्‍यात आली आहे. हा जबाब पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्‍यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव