शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महिला वाहकावर पतीचा चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 15:44 IST

जळगाव : नाशिक येथील ड्युटी संपवून परतलेल्या महिला वाहकावर पतीने कौटुंबिक वादातून चाकू हल्ला केला. यात महिला वाहक जखमी ...

जळगाव : नाशिक येथील ड्युटी संपवून परतलेल्या महिला वाहकावर पतीने कौटुंबिक वादातून चाकू हल्ला केला. यात महिला वाहक जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़ यात महिला वाहक गंभीर जखमी झाली आहे. नंदा वसंत बाविस्कर (वय-२९, रा़ खोटेनगर) असे त्या महिलेचे नाव आहे़ तर मिलिंद आनंदा वारडे असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव असून तो फरार आहे़खोटेनगर येथे नंदा बाविस्कर या कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत़ एस.टी. महामंडळात त्या महिला वाहक म्हणून नोकरीला असून काही महिन्यांपूर्वीचं त्यांची चोपडा आगरातून जळगाव आगारात बदली झाली आहे़ दरम्यान, त्यांचे लग्न चहार्डी येथील मिलिंद आनंदा वारडे यांच्याशी झाले होते़ गेल्या सात ते आठ महिन्यांपासून दोघेही विभक्त राहत आहे़ रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नंदा ह्या नाशिक येथून ड्युटी संपवून जळगाव बसस्थाकावर आल्या़ बसमधून उतरत असताना त्यांना पती मिलिंद हा समोर दिसला़ त्यानंतर दोघेही एकमेकांशी बोलत असताना अचानक पती मिलिंद याने नंदा यांच्या कानाजवळ चाकूने हल्ला केल्या़ त्यानंतर त्या गंभीर जखमी झाल्या़ यानंतर काही क्षणातचं पती हा त्याठिकाणाहून पसार झाला़बसस्थानकावर उडाली धावपळमहिला वाहकावर चाकू हल्ला झालेला पाहून बसस्थानकावर धावपळ उडाली़ त्यानंतर ही घटना आगार व्यवस्थापक नीलेश पाटील व स्थानक प्रमुख निलिमा बागुल यांना कळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली़ त्याचबरोबर विविध एस़टी़संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी आले.जिल्हा रूग्णालयात उपचार सुरूएस़टी़ महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जखमी महिला वाहन नंदा बाविस्कर यांना त्वरित जिल्हा रूग्णालयात दाखल केले़ त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येवून पोलिसांकडून जबाब नोंदवून घेण्यात आले़ दरम्यान, महिला वाहकाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले़ याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून पतीचा शोध घेतला जात आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव