शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात पत्नीनेच केला पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:16 IST

सतत होणा-या वादातून पत्नीनेच पतीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना पिंप्राळ्यातील भोईवाड्यात घडली आहे. बाळू धोंडू भोई (वय ४०) असे मृत पतीचे नाव असून पत्नी निर्मला हिला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपिंप्राळ्यातील घटना  चाकू हल्ला केल्यानंतर दोन दिवसांनी झाला मृत्यूपत्नी निर्मला हिला पोलिसांनी अटक केली आहे

जळगाव : सतत होणा-या वादातून पत्नीनेच पतीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना पिंप्राळ्यातील भोईवाड्यात घडली आहे. बाळू धोंडू भोई (वय ४०) असे मृत पतीचे नाव असून पत्नी निर्मला हिला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळा भोईवाड्यात राहणारे बाळू धोंडू भोई व पत्नी निर्मला यांच्यात सतत वाद होते. गुरुवारी रात्रीही मुलांसमोरच दोघांमध्ये वाद झाला.त्यातून पत्नी निर्मला हिने बाळू यांच्यावर चाकू  हल्ला केला. नेहमीचेच भांडण असल्याने शेजारी व नातेवाईकही त्यांना कंटाळले होते.जखमी अवस्थेत रात्रभर घरातचपत्नीने चाकूने भोसकल्यानंतर बाळू गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत असतानांही त्याला दवाखान्यात हलविले नाही. दुसºया दिवशी शुक्रवारी सकाळी बाळूचा भाऊ राजू यांना रात्रीच्या वादाची चाहूल लागली. गंभीर जखमी झालेल्या भावाला त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सकाळी ९.१५ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, गुरुवारी घटना घडल्यानंतर शुक्रवारी बाळू याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतरही एमएलसी अहवाल पोलिसांकडे गेला नाही किंवा पत्नी व अन्य नातेवाईकांनीही घटना पोलिसांना कळविली नाही. त्यामुळे शनिवारी या प्रकरणात थेट खुनाचाच गुन्हा दाखल झाला.उपअधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी बाळूचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे व विनोद शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयात मृत बाळू याच्या भावांचे जबाब नोंदविला. त्यानंतर मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव