शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला वाचवताना पतीचा मृत्यू; रूळ ओलांडताना रेल्वेखाली सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 22:00 IST

डोळ्यादेखतच पतीचा अपघात पाहण्याची वेळ

शामकांत सराफ

पाचोरा (जि. जळगाव) :  रेल्वे रूळ ओलांडतांना कामायनी एक्सप्रेसखाली सापडून महिलेसह दोन जण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना पाचोरा -परधाडे दरम्यान रेल्वे वळण रस्त्यावर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. यात पत्नीला वाचतांना पतीचा मृत्यू झाला.  रत्‍नाबाई माधवराव पाटील (६१, रा. दुसखेडा ता. पाचोरा) आणि अशोक झेंडू पाटील (६०, रा. पहाण ता. पाचोरा) अशी मृतांची नावे आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, परधाडे ता. पाचोरा येथे सप्ताहानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. तो आटोपून रत्‍नाबाई पाटील,  अशोक पाटील व त्यांची पत्नी बेबाबाई पाटील असे तीन जण परधाडेहून दुसखेडा गावाकडे जवळच्या मार्गाने पायीच निघाले होते. 

 परधाडे- पाचोरा रेल्वे रूळ ओलांडताना अचानक मुंबईकडे जाणाऱ्या कामायनी एक्सप्रेसखाली सापडून रत्‍नाबाई व अशोक पाटील हे दोघे जागीच ठार झाले. तत्पूर्वी  रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच अशोक पाटील यांनी त्यांच्या पत्नीस तात्काळ बाजूला सारल्याने त्यांच्या पत्नी बचावल्या आहेत.   डोळ्यादेखतच पतीचा अपघात पाहण्याची वेळ तिच्यावर आली. बेबाबाई यांच्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

 दरम्यान,  ही घटना रविवारी ५ वाजेच्या दरम्यान घडली.  मृतदेह ७ वाजेपर्यंत घटनास्थळीच पडून होते. पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती उशिरा मिळाली.

 

टॅग्स :Accidentअपघात