शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राखीव जागांसाठी आणखी किती प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 20:25 IST

आरटीई प्रवेश : प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांचा सवाल ; मुदतीपर्यंत २४५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीला सुरुवातीपासून अल्प प्रतिसाद मिळत होता. पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या ३३४१ विद्यार्थ्यांपैकी फक्त २४५४ विद्यार्थ्यांनीच शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश घेतला. दुसरीकडे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अद्यापही जाहीर झालेली नाही, शाळांमध्‍ये ऑनलाईन शिक्षण सुरू झालेले असल्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, त्यामुळे २५ टक्के राखीव जागांसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी, असा सवाल पालकांकडून उपस्थित करण्‍यात येत आहे.आरटीई २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी १७ मार्चला पहिली सोडत काढण्‍यात आली होती. त्यात जळगाव जिल्ह्यातील २८७ शाळांमधील ३५९४ जागांसाठी सुमारे ३३४१ विद्यार्थ्यांची निवड करण्‍यात आली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर झाला. परिणामी, या प्रवेश प्रक्रिया काही महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्‍यात आली आहे. सुरूवातील पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्‍यात आली होती. त्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली होती. आता ही मुदत संपली असून अद्याप प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सूचना न आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची कधी संपणार 'प्रतीक्षा'जिल्ह्यातील सुमारे २ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित केले आहे. आता ११४० रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षा यादीतील पालकांनी बालकांच्या प्रवेशासाठी सध्‍या शाळेत जावू नये, त्यांच्याकरिता स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर देण्‍यात येईल, अशी माहिती गेल्या सहा महिन्यांपासून देण्‍यात येत आहे. त्यातच शाळांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झालेले आहे. पाल्यांचे प्रवेश झालेले नसल्यामुळे ते ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठीची प्रवेश प्रक्रिया राबविण्‍यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.१८० अर्ज रिजेक्टशाळांमध्ये प्रवेश निश्चित केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून मुळ कागदपत्रांची तपासणी करण्‍यात येत आहे. कागदपत्रांच्या अभावासह काही त्रुटींमुळे १८० विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट करण्‍यात आलेले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव