शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस यंत्रणा गाफिल कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 17:36 IST

 अमळनेर येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या मेळाव्यात माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांच्या साक्षीने अर्थात त्यांच्या डोळ्यासमोर मारहाण झाली. व्यासपीठावर बसलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी स्वत:च त्याची सुरुवात केली. इतकी मोठी घटना घडण्याआधी पोलीस यंत्रणेला संकेत कसे मिळाले नाहीत. पोलिसांची गोपनीय यंत्रणा नेमकी काय करीत होती? असा प्रश्न आता या निमित्ताने चर्चिला जात आहे.

ठळक मुद्दे विश्लेषणअमळनेरातील राडाभाजप व पोलीस यंत्रणेची नाचक्की

सुनील पाटीलजळगाव :  अमळनेर येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या मेळाव्यात माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांच्या साक्षीने अर्थात त्यांच्या डोळ्यासमोर मारहाण झाली. व्यासपीठावर बसलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी स्वत:च त्याची सुरुवात केली. इतकी मोठी घटना घडण्याआधी पोलीस यंत्रणेला संकेत कसे मिळाले नाहीत. पोलिसांची गोपनीय यंत्रणा नेमकी काय करीत होती? असा प्रश्न आता या निमित्ताने चर्चिला जात आहे.माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यावर जो अश्लिल बोलण्याचा रोष होता. तो शब्द प्रयोग काही या मेळाव्यात झालेला नव्हता. त्याआधी पारोळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बी.एस.पाटील बोलले होते. त्यानंतर उदय वाघ गटात खदखद सुरु होती. अमळनेर येथे मेळावा होणार आहे व तेथे बी.एस.पाटील व उदय वाघ गटाचे कार्यकर्ते असणार. वाघ व डॉ.पाटील हे दोघंही व्यासपीठावर असणार हे देखील ठरलेले होते, मग पारोळ्यातील भाषणाची ठिणगी अमळनेरात पडू शकते याची कल्पना पक्षातील कार्यकर्त्यांना असताना पोलिसांच्या गोपनीय यंत्रणेला का असू नये? की मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अर्थात वाघ व डॉ. पाटील यांच्यात अनेक दिवसापासून वितुष्ट आहे. भाजपच्या बैठकीत उदय वाघ यांनी डॉ.बी.एस.पाटील यांचा अपमान असो की, स्मिता वाघ यांचे जाहीर झालेले लोकसभेचे तिकीट कापण्याचा विषय असो.. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी व नाराजी प्रचंड वाढलेलीच होती. दोन मंत्र्यांच्या समक्ष व तेही जिल्हाध्यक्षाकडून माजी आमदारालाच मारहाण होईल हे अपेक्षित नव्हते. कोणत्याही गोष्टीचे आधी संकेत मिळतात. तसे संकेत या वादाचेही मिळालेले होते, अशी चर्चा अमळनेरात आहे? मग असे असताना पोलिसांना का खबरदारी घेता आली नाही.. या प्रकरणामुळे भाजपची तर नाचक्की झालीच, पण पोलीस यंत्रणेच्या गोपनीय विभागाचेही पितळ उघडे पडले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव