वरणगाव : येथील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये दोन युवकात भांडण झाले होते. ते सोडविण्यास गेलेल्या हॉटेलमालकाच्या डोक्यात बीअरची बाटली मारल्याने ते जखमी झाल्याची घटना घडली.
सूत्रांनुसार, शिवाजी नगरातील रहिवासी संजय रमेश इंगळे हा त्याच्या मित्रासोबत हॉटेल पारसमध्ये बीअर पीत होता. त्या ठिकाणी तळवेल येथील संदीप मधुकर सुरवाडे आल्याने दोघात शाब्दिक बाचाबाची होऊन एकमेकांना शिवीगाळ करीत असताना हॉटेलमालक ज्ञानदेव हरी झोपे हे भांडण सोडविण्यास गेले. त्यावेळी संजय याने आपल्या हातातील बीअरची बाटली झोपे यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत हॉटेलमालक ज्ञानदेव हरी झोपे यांच्या फिर्यादीवरून संजय इंगळे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.