शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:16 IST

जनता त्रस्त : निम्मा पावसाळा संपल्यावर मागविल्या निविदा

जळगाव : शहरात प्रत्येक रस्ते व गल्ल्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा आहे की ख•यात रस्ता हेच कळत नाही. या खड्डयांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहे. नागरिकांची ओरड व राजकीय पक्षांचे आंदोलनानंतर जागे झालेल्या महापालिकेने खड्डे दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या,त्याही निम्मा पावसाळा संपल्यानंतर! मनपाचा हा प्रकार म्हणजे वरातीमागून घोडे असाच आहे.दरम्यान, या खड्डयांच्या प्रश्नावर महापौर भारती सोनवणे यांनी मंगळवारी बांधकाम विभागाची बैठक बोलावली. स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, आयुक्त सतीश कुलकर्णी, गटनेते भगत बालाणी, नवनाथ दारकुंडे, अ‍ॅड.दिलीप पोकळे, चेतन सनकत, सुरेश सोनवणे, शहर अभियंता डी.एस.खडके आदी उपस्थित होते. शहरात अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. नव्याने रस्ते तयार करण्यास अडचण असली तरी रस्त्यांची डागडुजी करण्यास काहीही अडचण नाही, त्यामुळे तात्काळ प्रक्रिया राबवावी अशा सूचना महापौर सोनवणे यांनी दिल्या.निविदा प्रक्रिया सुरुसर्व खड्डे खडी, मुरुम टाकून बुजविणे आवश्यक असून त्यादृष्टीने शॉर्ट टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आठ दिवसात प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात कामाला १२ दिवसांनी सुरुवात होणार असल्याची माहिती शहर अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. अनेक ठिकाणी काम बाकी असल्याने रस्त्यांचे काम देखील करता येणार नाही. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पक्ष व विविध संघटना विविध प्रकारचे आंदोलने करीत आहेत. निम्मा पावसाळा संपण्यात आल्यावर मनपाने निविदा काढणे व खड्डे दुरुस्तीचा निर्णय घेतला. पावसाळा सुरु होण्याआधीच ही कामे होणे अपेक्षित होते.रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत एकत्र येण्याचे आवाहनबळीराम पेठेतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होत आहेत. या विरोधात आवाज उठविण्यासाठी नागरिकांनी २३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता बळीराम पेठेतील साई मंदिराजवळे एकत्र येण्याचे आवहन स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी भोगे-पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव