वरणगाव : येथे भाजपच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शिक्षकांना गीता भेट देऊन सन्मान केला व आशीर्वाद घेतले.
अध्यक्षस्थानी शिक्षक आर.ए. वाघ होते. यावेळी शिक्षक बी.एम. राठोड, विलास तायडे, मधुकर वानखेडे, अनिल देशपांडे, सुवर्णलता तायडे, जंजाळे, किरण अहिर, व्ही.वाय. चौधरी, अनिल बाविस्कर, सतीश इंगळे, आर.डी. पाटील, प्रा. भागवत पाटील, सुनील पाटील, प्रा. निंबोळकर, पी.एन. सोलंके, आर.एस. सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांना भगवद्गीता ग्रंथ भेट दिला.
यावेळी सुनील माळी ॲड. ए.जी. जंजाळे, मिलिंद भैसे, रमेश पालवे, अनिल वंजारी, महिलाध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, योगेश माळी, आकाश निमकर, पप्पू ठाकरे, कश्यप कमलाकर मराठे, विशाल कुंभार, मंगेश कुंभार, सुमित तायडे, नरेंद्र बावणे, रामदास बावणे, राहुल जंजाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.