शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श मतदान केंद्रासाठी धडपडणाऱ्या तलाठ्याचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 15:10 IST

वाडे येथील तलाठी रत्नदीप माने यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कजगाव, ता.भडगाव : तालुक्यातील वाडे येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यासाठी धडपड करणारे तलाठी रत्नदीप माने यांना सन्मानित करण्यात आले.तहसीलदार तृप्ती धोडमिसे  यांच्या संकल्पनेतून आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. मतदारांना आदर्श मतदान केंद्रांवर उत्तम सुविधा मिळतील याची दक्षता घेण्यात आली होती. ते उभारण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे तलाठी रत्नदीप माने यांनी परिश्रम घेतले होते. तसेच त्यांनी १० गावांचा अतिरिक्त पदभार सांभाळून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान एव्हीएम मास्टर ट्रेनर म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडली. या बाबीची दखल घेत तहसीलदार तृप्ती धोडमिसे  यांनी माने यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केलेया मतदान केंद्रांवरील अपंग, महिला आणि वृद्ध लोकांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली गेली. त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सर्वसाधारण मतदान केंद्रांच्या असह्य वातावरणापेक्षा इथले वातावरण बर्‍याच प्रकारे विशेष असेल याची दक्षता घेण्यात आली होती. मतदारांना आदर्श मतदान केंद्रावर पोहोचण्यास अडचण येऊ नये, यासाठी केंद्राच्या कक्षेत असलेल्या सर्व मार्गांवर दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. कोरोना संबंधित सूचनांचे जागोजागी पोस्टर लावण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग करण्यात आले होते. लोकांना बराच काळ रांगेत उभे रहावे लागेल, यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. आदर्श मतदान केंद्रांवर मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणा घरे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे,  रॅम्प उपलब्ध होते. या केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध होत्या. गर्भवती महिलांना किंवा त्यांच्या हाताला लहान मुले असल्यास प्राधान्याच्या आधारावर महिला मतदारांना प्रथम मतदान करण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच त्यांना विश्रांतीसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला होता. सर्व मतदार शांततेत व आरामात मतदान करू शकतील यासाठी प्रशासनाने मतदान केंद्रांवर व्यवस्था केली होती 

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव