शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

भुसावळात विशेष तिकीट  निरीक्षकांचा  सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 16:26 IST

भुसावळात विशेष तिकीट  निरीक्षकांचा  सन्मान करण्यात आला.

भुसावळ : मंडळ वाणिज्य कार्यालयात  वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या हस्ते विशेष तिकीट निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सन्मानार्थ  रामकर प्रसाद राम, अनिल सोनी (खंडवा) आणि  कमलेश  बऱ्हाणपूर या  तिकीट निरीक्षकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कर्तव्याप्रति निष्ठा आणि निस्वार्थपणे त्यांनी  प्रवाशांचे गाडीत सुटून गेलेले  सामान परत मिळवून दिले आणि त्यांनी प्रवाशाला नि:स्वार्थपणे मदत केली.उप-मुख्य तिकीट निरीक्षक,  रामकर प्रसाद राम, अनिल सोनी  (खंडवा) स्टेशन येथे कार्यरत असलेले  यांनी प्रसंगावधाने  गाडीत सुटलेली प्रवाशाची बॅग परत केली.२  रोजी दुपारी तीनच्या सुमारास गोवा एक्स्प्रेसने कार्य करून  खंडवा येथे आले आणि दोन्ही कर्मचारी कार्यालयात पोहचले तेव्हा पवन एक्स्प्रेसदेखील प्लॅटफॉर्म एकवरून रवाना  झाली. त्याच वेळेस अचानक एक प्रवासी त्याच्या पत्नीसह त्याच्याकडे आला. दोघेही  घाबरलेल्या अवस्थेत होते. ते नुकतेच  जबलपूरहून पवन एक्स्प्रेसने खंडवा येथे आले असल्याचे प्रवाशांनी सांगितले. एस -३ कोचमध्ये १८ आणि १९ चा बर्थ  होता. गाडीमधून उतरल्यावर कळले की लॅपटॉप व आवश्यक कागदपत्रे असलेली बॅग ते बर्थ क्रमांक १९  वर राहून गेली आहे. याची माहिती मिळताच तिकीट निरीक्षक रामाकर प्रसाद राम यांनी विलंब न करता ताबडतोब पवन एक्सप्रेसच्या ऑन ड्यूटी टीटीईला शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी   बऱ्हाणपूरला कार्यरत  टीटीई  कमलेश यांना संपूर्ण घटना सांगितली. या माहितीमुळे पवन एक्सप्रेस बऱ्हाणपूरला पोहोचताच कमलेश कोच क्रमांक  एस-३ मधील  बर्थ क्रमांक १९ ला पोहोचले आणि त्यांनी बॅग तिथे ठेवल्याचे पाहिले व  ताब्यात घेतली. राम यांनी  बऱ्हाणपूर टीटीईला खंडवाकडे येणार्‍या ताप्तीगंगा एक्स्प्रेसमधून बॅग्स खंडवा येथे आणण्यास सांगितले. त्यानंतर  कमलेश यांनी ती बॅग ताप्ती गंगा एक्स्प्रेस ने बुरहानपुर येथून खंडवा येथे बॅग पोचविली.  बॅग  प्रवाशांना  सुपुर्द केली. याची दखल घेत  प्रशासनाकडून त्यांचा यथोचित्त सन्मान करण्यात आला. मंडल वाणिज्य प्रबंधक  बी.अरुणकुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक  (टी.जा .) अनिल पाठक यावेळी  उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ