शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात पुन्हा चार ठिकाणी घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:49 IST

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. रविवारी शिव कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा चार ठिकाणी घरफोडी झालेली आहे. दोन ठिकाणाहून लाखोचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे तर दोन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. सव्वा महिन्याच्या कालावधीत तब्बल २५ च्यावर घरफोड्या झालेल्या आहेत.

ठळक मुद्दे लाखोचा ऐवज लंपास  निवृत्ती नगरात तीन तर पटेल नगरात एका ठिकाणी घरफोडी पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

जळगाव : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. रविवारी शिव कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा चार ठिकाणी घरफोडी झालेली आहे. दोन ठिकाणाहून लाखोचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे तर दोन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. सव्वा महिन्याच्या कालावधीत तब्बल २५ च्यावर घरफोड्या झालेल्या आहेत. रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हददीतील उच्चभू अशा पटेल नगरात प्रवीणचंद्र दिनाभाई पटेल यांच्या घरातून चोरट्यांनी ८५ हजाराची रोकड लांबविली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रवीणचंद्र पटेल ६ ते ८ आॅगस्ट दरम्यान बाहेरगावी गेले होते. शनिवारी ते घरी परतले असता बंद घराचे कुलुप तोडून कपाटातील ८५ हजाराची रोकड गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोमवारी त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ तपास करीत आहेत.पोळ्याला गेलेल्या बॅँक कर्मचाºयाच्या घरातून लाखोचा ऐवज लंपासपोळा सणानिमित्त सामनेर, ता.पाचोरा येथे मुळ गावी गेलेल्या रामचंद्र भगवान साळुंखे (रा.निवृत्ती नगर, जळगाव) यांच्या स्वामी समर्थ केंद्राच्या समोरील बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. साळुंखे हे जिल्ह बॅँकेत नोकरीला आहेत. रविवारी ते पत्नी अनिता यांच्यासह सामनेर येथे गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून कपाटात ठेवलेली ४५ हजार रुपये किमतीची अडीच तोळ्याची पोत, ३० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, २५ हजार रुपये किमतीचे पेंडल, १५ हजार रुपये किमतीच्या कानातील रिंगा, ५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा तुकडा, ५ हजार रुपये किमतीची चांदीची मुर्ती लांबविण्यात आली आहे.दोन्ही ठिकाणी चोरट्यांची निराशासाळुंखे यांच्या घरात डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आधारसिंग लक्ष्मणसिंग पाटील व महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी भरत पाटील यांच्याकडे वळविला. या दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव