शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हिंगोणा येथील पाणी प्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 15:15 IST

हिंगोणा येथील पाणीप्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी गंभीर दखल घेतली. पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी यावल येथील पाणीपुरवठ्याशी संबंधित अधिकारी तसेच जळगावी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली.

ठळक मुद्दे‘लोकमत’ वृत्ताची दखलपाणीटंचाई निवारणार्थ यावल येथील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या सूचनाजिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चाजलस्वराज्यची विहीर खोलीकरण करणेवनविभागाची ट्यूबवेल अधिग्रहीत करणेमुख्य टाकीखाली अंडरग्राउंड टाकी बांधण्याच्या केल्या सूचना

हिंगोणा, ता.यावल : येथील पाणीप्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी गंभीर दखल घेतली. पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी यावल येथील पाणीपुरवठ्याशी संबंधित अधिकारी तसेच जळगावी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ठळकपणे प्रसिद्ध केले होते.हिंगोणा येथे पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत असून, संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आणून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले व प्रशासक बसवावा, अशी मागणी केली होती. याची दखल आमदार जावळे यांनी घेतली व स्वत: हिंगोणा येथे येऊन ग्रामपचायतीच्या कार्यकारी मंडळाशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर हिंगोणा गावाच्या पाणी समस्येबाबत चर्चा केली. बंद असलेली गावातील जलस्वराज विहीर खोलीकरण करणे, वनविभागाची ट्यूबवेल अधिग्रहीत करणे आणि राष्ट्रीय पेयजल योजना लवकरात लवकर कार्यरत करणे तसेच मुख्य टाकीखाली अंडरग्राउंड टाकी (स्टोरेज टँक) बांधणे अशा सूचना दिल्या.दरम्यान, याआधी ग्रामपंचायत कार्यालयाला संतप्त महिलांनी लावलेली कुलूप काढण्यात आले.यावेळी सरपंच सत्यभामा भालेराव, श्याम महाजन, भरत पाटील, अरमान तडवी, मनोज वायकोळे, उमेश भालेराव, बाळू कुरकुरे, महेंद्रसिंग पाटील, रवींद्र जावळे आदी उपस्थित होते.हिंगोणा गावातील पाणी समस्या ही गंभीर आहे. पाण्याची तीव्रता ही आठवडेभरात कमी होईल. यासाठी मी स्वत: जातीने लक्ष देणार आहे. लवकरात लवकर पाणी प्रश्न मार्गी लावेल व त्यासाठी ग्रामस्थांनी कार्यकारी मंडळाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.-हरिभाऊ जावळे, आमदार, रावेर-यावल

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल