शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हिना- रिजवान यांचे जीवन फुलविले मोईनने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 01:16 IST

भुसावळ : मोहम्मदिया नगरातील रहिवासी हिना कौसर ही घटस्फोटिता आपल्या सहा वर्षाच्या रिझवानसोबत आपले एकाकी जीवन जगत होती. तिने ...

ठळक मुद्दे भुसावळ येथे झालेला अनोखा विवाह सोहळाया विवाह समारंभात सर्व प्रमुख व्यक्तींची उपस्थिती

भुसावळ : मोहम्मदिया नगरातील रहिवासी हिना कौसर ही घटस्फोटिता आपल्या सहा वर्षाच्या रिझवानसोबत आपले एकाकी जीवन जगत होती. तिने विचारही केला नव्हता की, तिचे जीवन एकदा पुनश्च बहरेल. तिच्या अनाथ बाळाला मोईन रूपाने नाथ मिळेल व ती घटस्फोटित व बाळाची आई असताना तिला तरुण पती मिळेल.मोहम्मदिया नगरातील रहिवासी असलेला मोईन शेख तरुणाचा विवाह झालेला नव्हता. आपल्यापेक्षा वयाने मोठी तसेच सहा वर्षाचा बाळ असतानासुद्धा मोइन शेखने हिनाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले व आपल्या पालकांना होकार कळविला.वडील नईम शेख, त्यांचे काका पापा कालू व रफिक कालू यांनी हिनाचे आई व काका यांच्याशी बोलणी केली. इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा शुक्रवारी संपूर्ण जगात वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांचे जीवन चरित्र आपल्या जीवनात आणण्याची प्रत्येक मुस्लिम समाजाच्या तरुणांनी प्रार्थना केली वास्तविक पाहता अंतिम प्रेषित यांचा सुद्धा पहिला विवाह आपल्या वयाने १५ वर्ष मोठ्या असलेल्या व विधवा असलेल्या हजरत खतीजा सोबत झालेला होता हीच परंपरा मोइनने कायम ठेवत आपल्याशी वयाने मोठी असलेल्या व सहा वर्षाचा बाळ रिजवानसोबत जीवन जगत असलेल्या घटस्फोटितेसोबत विवाह केले.खुत ब ए निकाह हाफिज रईस यांनी यांनी पठण केले तर या विवाहासाठी हिनातर्फे वकील म्हणून शौकत मजीद शेख यांनी व मोईन, वधूतर्फे साक्षीदार म्हणून इम्तियाज शेख व युसुफ बागवान यांनी भूमिका निभावली.या विवाह समारंभात सर्व प्रमुख व प्रतिष्टीत व्यक्तींची उपस्थिती होती. त्यात प्रामुख्याने हिनातर्फे तिचे भाऊ पोलीस कॉन्स्टेबल इम्रान शेख, वकार शेख, शेख हसन, चिनावलचे माजी सरपंच कलीम डेप्युटी, साजिद शेख, तसलीम पठाण, अजीम हाजी, सैय्यद पोस्ट मास्टर, वारीस खान, वाहिद खान, ईल्यास शाह, गुफारान शेख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ