शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाने घेतला आणखी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:35 IST

बांभोरीजवळ अपघात : पाळधी जाताना घडली दुर्घटना

जळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने राजेंद्र किसन केवारे (४०, रा.पिंप्राळा) हे जळगाव आगाराचे बस कंडक्टर (वाहक) जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजता महामार्गावरील बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र केवारे जळगाव एस.टी.आगारात कंडक्टर होते. थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन येतो असे केवारे यांनी घरात सांगितले. दुचाकीने (क्र.एम.एच.१९-५२४३)पाळधीकडे जायला निघाले. बांभोरी गाव ओलांडल्यानंतर एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर अपघात झाला.भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात केवारे दुचाकीवरून खाली फेकले गेले व त्यातच त्यांच्या पोटावरून ट्रकचे टायर गेले. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या मांसाचे तुकडे झाले व जागीच गतप्राण झाले.अपघात होताच बांभोरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाळधी दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी गजानन महाजन व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.धुळ्याहून झाली होती बदलीराजेंद्र केवारे हे मूळ धुळे येथील रहिवाशी होते. याआधी ते शनी पेठेत वास्तव्याला होते. आता ते पिंप्राळा येथे वास्तव्याला गेले होते. त्यांची काही दिवसापूर्वीच जळगाव आगारात बदली झाली होती. त्यांचे आई, वडील धुळे येथे वास्तव्याला आहेत. पत्नी योगिता, मुलगा कुणाल व सुमीत यांच्यासह ते जळगावात वास्तव्याला होते.ट्रक अपघातातील दुसºया भावाचाही मृत्यूगेल्या आठवड्यात विद्यापीठासमोर ट्रक अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रल्हाद रमेश पाटील (३०, रा.पाळधी, ता.धरणगाव) या तरुणाचा रविवारी मध्यरात्री उपचार सुरु असताना मृत्यू झाला. १७ मे रोजी सकाळी ९ वाजता मजूर घेऊन जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. त्यात महेंद्र रमेश पाटील (३६) हा मोठा भाऊ जागेवरच ठार झाला होता तर प्रल्हाद गंभीर जखमी झाला होता. रविवारी रात्री प्रल्हादची प्राणज्योत मालवली. प्रल्हाद हा छायाचित्रकार होता. दोन दिवसात दोन छायाचित्रकारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रविवारी उमेश प्रजापत या छायाचित्रकाराचा कार अपघातात राजस्थानात मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव